Shocking: आधी मैत्रिणीशी समलिंगी विवाह, नंतर नाशिकच्या तरुणाशीही लपून लग्न; शरीरसंबंधाचा व्हिडिओ पाहताच...

Nashik Crime: एका तरुणीने आधी पुण्यातील मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केला. त्यानंतर तिने आई-वडिलांच्या दबावामुळे नाशिकच्या तरुणासोबत लग्न केले. तरुणाने जेव्हा बायकोचा मोबाइल तपासला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला अन् ही घटना उघडकीस आली.
Shocking: आधी मैत्रिणीशी समलिंगी विवाह, नंतर नाशिकच्या तरुणाशीही लपून लग्न; शरीरसंबंधाचा व्हिडिओ पाहताच...
Nashik Shocking NewsSaam Tv
Published On

Summary -

  • नाशिकमध्ये एका तरुणाची लग्नामध्ये मोठी फसवणूक झाल्याची घटना घडली.

  • तरुणीने आधी मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केला. त्यानंतर नाशिकच्या तरुणाशी लग्न केले.

  • तरुणीच्या मोबाईलमध्ये अश्लिल मेसेज, शरीरसंबंधाचे व्हिडीओ तरुणाने पाहिले तेव्हा घटना उघडकील आली.

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आधी पुण्यात मैत्रिणीसोबत समलैंगिक लग्न केलं. त्यानंतर तिने नाशिकमध्ये जाऊन एका तरुणाशी विवाह केला. अखेर या तरुणीचं सत्य बाहेर आल्यानंतर तरुणाला आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी त्याने पोलिस ठाण्यात धाव घेत फसवणूक करणाऱ्या तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली. नाशिकरोड पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार करत सांगितले की, त्याचे लग्न एका २७ वर्षीय तरुणीसोबत झाले होते. पण तिच्या वागण्यात त्याला सतत विचित्रपणा जाणवत होता. लग्नानंतर ती या तरुणाला माझ्या अंगाला हात लावलास तर मी आत्महत्या करेल अशी धमकी देत होती. लग्नानंतर ती सतत कुणाशी तरी फोनवर बोलायची. समोरच्या व्यक्तीला सतत व्हिडीओ कॉल करायची आणि चॅटिंग देखील तिचे सुरू होते.

Shocking: आधी मैत्रिणीशी समलिंगी विवाह, नंतर नाशिकच्या तरुणाशीही लपून लग्न; शरीरसंबंधाचा व्हिडिओ पाहताच...
Shocking: अंगाई गीत गायलं, मांडीवर झोपवलं नंतर...; आईनेच घेतला पोटच्या चिमुकलीचा जीव

तरुणाने तक्रारीत असे देखील सांगितले की, लग्नानंतर एमकॉमच्या परीक्षेसाठी तरुणी माहेरी गेली होती. यावेळी तिने लग्नात आम्ही तिला घातलेले ३ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हरविल्याचे सांगितले. ती माहेरून परत आली त्यानंतर तरुणाने तिचा मोबाईल चेक केला असता त्याला हादरला बसला. तरुणाला बायकोच्या समलैंगिक विवाहबद्दल कळाले आणि त्याच्या पायाखालची जमिन सरकली. त्यानंतर तरुणाने बायकोच्या माहेरी जाऊन सासरच्याला आमची फसवणूक का केली? अशी विचारणा केली. तर सासऱ्याने त्याला शिवीगाळ करत धमकावले.

Shocking: आधी मैत्रिणीशी समलिंगी विवाह, नंतर नाशिकच्या तरुणाशीही लपून लग्न; शरीरसंबंधाचा व्हिडिओ पाहताच...
Shocking : विषारी सापाने दंश केला, नशेत तरूणाने दाताने फाडला, अन् बेडवरून घेऊन झोपला, सकाळी धक्का!

त्यानंतर तरुणाने नाशिकरोड पोलिस ठाण्यात धाव घेत आपली फसवणूक केल्याचे सांगितले. या प्रकरणी त्याने पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तरुणाने जेव्हा बायकोचा मोबाइल चेक केला तेव्हा त्याला कळाले की पुण्यातील एका मैत्रिणीसोबत त्याच्या बायकोने आधीच समलैंगिक लग्न केले होते. तिच्या मोबाइलमध्ये अश्लिल चॅट, बाथरूममधील एकमेकींचे विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ कॉल, एकमेकींच्या शरीरसंबंधाचे व्हिडिओ होते. तसंच, तरुणाची बायको तिच्या मैत्रिणीला माझ्या नवऱ्याचा कसा गेम करते बघ असे व्हिडीओ कॉलमध्ये बोलत असल्याचा व्हिडीओ देखील तरुणाने पाहिला. त्यानंतर त्याला मोठा धक्का बसला.

Shocking: आधी मैत्रिणीशी समलिंगी विवाह, नंतर नाशिकच्या तरुणाशीही लपून लग्न; शरीरसंबंधाचा व्हिडिओ पाहताच...
Shocking : कांदेपोह्याचा कार्यक्रम केला, रितीरिवाजाप्रमाणे लग्नगाठ बांधली, पहिल्याच रात्री वधूने केला कारनामा, लाखोंचे दागिने घेऊन फरार

तरुणाने ज्यावेळी आपल्या आईला ही गोष्ट सांगितली तर त्यांनी त्याच्या बायकोला जाब विचारला. तर तिने आपल्याला पुरूषांमध्ये अजिबात इन्टरेस्ट नाही असे सांगितले. तसंच मैत्रिणीसोबत समलैंगिक विवाह केल्याचे आपल्या आई-वडिलांना माहिती असल्याचे तिने सासूला सांगितले. आई-वडिलांनीच आपले जबरदस्तीने लग्न लावून दिले. तसंच तरुणासोबत लग्न होऊ नये यासाठी तरुणीने आत्महत्या करण्याची आणि घर सोडून जाण्याची देखील धमकी आई-वडिलांना दिली होती. महत्वाचे म्हणजे, तरुणाला सिगारेट, हुक्क्याचे व्यसन असल्याचे देखील तपासामधून उघड झाले आहे. ही घटना समोर येताच खळबळ उडाली आहे.

Shocking: आधी मैत्रिणीशी समलिंगी विवाह, नंतर नाशिकच्या तरुणाशीही लपून लग्न; शरीरसंबंधाचा व्हिडिओ पाहताच...
Shocking : ३ वर्षांपासून प्रेमसंबंध! तरुणानं काकीशी थेट पोलीस ठाण्यात केलं लग्न, दोघांचा 'तो' Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com