Shocking: अंगाई गीत गायलं, मांडीवर झोपवलं नंतर...; आईनेच घेतला पोटच्या चिमुकलीचा जीव

Rajasthan Crime: राजस्थानमध्ये आईनेच आपल्या पोटच्या ३ वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. अंगाई गीत गात मुलीला झोपवलं नंतर तिला तलावात फेकून दिलं. या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे.
Shocking: अंगाई गीत गायलं, मांडीवर झोपवलं नंतर...; आईनेच घेतला पोटच्या चिमुकलीचा जीव
Rajasthan Shocking News Saamtv
Published On

राजस्थानच्या अजमेरमध्ये आईने पोटच्या मुलीची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या ३ वर्षांच्या मुलीला आधी अंगाई गीत गात झोपवलं. त्यानंतर झोपलेल्या मुलीला घेऊन ती फिरण्यासाठी तलावाच्या काठावर गेली. त्याठिकाणी तिने आपल्या मुलीला तलावामध्ये फेकून दिलं. मुलीची हत्या केल्यानंतर या महिलेने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. अखेर पोलिस तपासादरम्यान महिलेचा खरा चेहरा समोर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपल्या नवऱ्याला सोडल्यानंतर राजस्थानच्या अजमेरमध्ये एका व्यक्तीसोबत राहत होती. या महिलेला पहिल्या नवऱ्यापासून मुलगी होती. या मुलीला सोबत घेऊन ती या व्यक्तीसोबत राहत होती. त्यामुळे ही व्यक्ती या महिलेला सतत टोमणे मारायचा. याच त्रासाला महिला कंटाळली होती.

मंगळवारी रात्री उशिरा गस्तीवर असताना एका पोलिसाला ही महिला दिसली. त्यांनी तिला तुम्ही ऐवढ्या रात्री इथे काय करता असे विचारले. तेव्हा या महिलेने सांगितले होते की, तिची ३ वर्षांची मुलगी घराबाहेर पडली होती पण ती अचानक गायब झाली. मी रात्रभर तिचा शोध घेतला पण ती काही सापडली नाही.

Shocking: अंगाई गीत गायलं, मांडीवर झोपवलं नंतर...; आईनेच घेतला पोटच्या चिमुकलीचा जीव
Cyber Crime : शेअर बाजारात जास्तीचा नफा दाखवून गंडविले; साडेपाच लाखांचा लावला चुना

या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ही महिला मुलीला हातामध्ये घेऊन शहरातील आना सागर तलावा किनारी फिरण्यासाठी गेली होती. काही तासानंतर मध्यरात्री दीड वाजता ही महिला एकटीच फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याचे सीसीटीव्हीत दिसले. तिच्या हालचाली संशयास्पद होत्या. बुधवारी सकाळी पोलिसांना चिमुकलीचा मृतदेह तलावात दिसला. त्यानंतर पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली असता तिने मुलीची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला.

Shocking: अंगाई गीत गायलं, मांडीवर झोपवलं नंतर...; आईनेच घेतला पोटच्या चिमुकलीचा जीव
Beed Crime News : "आज माझा वाढ‌दिवस, मुळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडणार नाही" बीडमध्ये तरुण व्यवसायिकावर जीवघेणा हल्ला

या गुन्ह्यात एकट्या महिलेचाच सहभाग होता. तिचा लिव्ह इन पार्टनर अखिलेशला पहाटे मुलगी बेपत्ता असल्याचे कळाले. अखिलेश महिलेला तिच्या मुलीवरून सतत टोमणे मारत होता. यामुळे महिला प्रचंड वैतागली होती. त्यामुळे तिने हे धक्कादायक कृत्य केले. आरोपी महिला वाराणसीची आहे. नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर ती प्रियकरासोबत अजमेरमध्ये लिव्ह इनमध्ये राहत होती. ती एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. अखिलेश देखील तिथेच काम करत करतो.

Shocking: अंगाई गीत गायलं, मांडीवर झोपवलं नंतर...; आईनेच घेतला पोटच्या चिमुकलीचा जीव
Kej Crime : केज गटशिक्षणाधिकारी विरोधात विनयभंगाचा गुन्हा; अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com