पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात मोठा राडा; वकील आणि IPS महिला अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

UP police and lawyer clash : वाराणसीतील पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात मोठा राडा झाला. यावेळी वकील आणि IPS महिला अधिकाऱ्यांची बाचाबाची झाली.
UP police and lawyer viral video
UP police and lawyer clash Saam tv
Published On
Summary

पोलीस आयुक्त कार्यालयात वकील आणि महिला आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची

दोघांच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

वकिलांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला केली होती मारहाण.

या घटनेने पोलीस आणि वकील यांच्यातील संबंध झाले अधिक तणावपूर्ण

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये पोलिस आणि वकिलांमधील वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय. पोलीस आणि वकिलांच्या वादादरम्यान आणखी एक घटना समोर आली आहे. वाराणसीतील पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात एका महिला आयपीएस अधिकारी आणि वकिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

वाराणसी पोलीस कार्यालयात शनिवारी वकील आणि पोलिसांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. वकिलांच्या गटाने पोलिसांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. दोन्ही गटातील वादाने परिसरात एकच खळबळ उडाली. दोन्ही गटाने एकमेकांना खडेबोल सुनावले.

UP police and lawyer viral video
Madhubhai Kulkarni : PM मोदींना राजकारणात आणणारे मधुभाई कुलकर्णी यांचं निधन; छत्रपती संभाजीनगरात घेतला अखेरचा श्वास

काय आहे प्रकरण?

तीन दिवसांपूर्वी एका वाराणसीतील पोलीस कर्मचाऱ्याला वकिलांच्या गटाने मारहाण केली होती. या मारहाण प्रकरणानंतर या वकिलांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात कोणतीही कारवाई न झाल्याने पोलीस कर्मचाऱ्याचे नातेवाईक पोलीस कार्यालयात आले होते. त्यावेळी वकील देखील मोठ्या संख्येने पोहोचले.

पोलिसाचे नातेवाईक आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाली. या वादात उपस्थित पोलिसांनाही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही गटामध्ये मोठा राडा झाला. दोन्ही गटाच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे. या वादात आयपीएस नीतू कादयान यांनी उडी घेतली. आयपीएस नीतू कादयान यांनी तुम्ही आम्हाला शांत करणार का, असा सवाल एका वकिलाला केला. त्यानंतर या वकील आणि आयपीएस नीतू यांच्यातही बाचाबाची झाल्याची पाहायला मिळाली.

UP police and lawyer viral video
Thane Shocking : क्षणात होत्याचं नव्हतं झालं; स्टोअर मॅनेजरचा इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Q

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये नेमकं काय घडलं?

A

एका पोलीस कर्मचाऱ्याला वकिलांकडून झालेल्या मारहाणीमुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर वाराणसी पोलीस आयुक्त कार्यालयात वकील आणि आयपीएस अधिकारी नीतू कादयान यांच्यात बाचाबाची झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com