बीडमध्ये व्यवसायिकावर लोखंडी कत्तीने हल्ला
जीव वाचवण्यासाठी मित्राच्या घरी लपले
गोपाल जाधव गंभीर जखमी झाले असून पोलिसात तक्रार नोंदवली
घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण
बीड मधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. बीड मधील एका तरुण व्यवसायिकाला जुन्या वादातून मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारेकऱ्यांनी व्यावसायिकाला "आज माझा वाढदिवस आहे, तुझा मुळशी पॅटर्न केल्याशिवाय जिवंत सोडणार नाही" अशी धमकी दिली. दरम्यान जखमी व्यवसायिक गोपाल भागवत जाधव यांनी जयपाल आशोक माने आणि निशांत विष्णु जाविर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
गोपाल जाधव यांनी म्हटल्यानुसार, काल अंबाजोगाई परळी रोड मगरवाडी फाटा येथे माऊली अँग्रो एजन्सी नावाच्या कृषी केंन्द्र दुकानात ते बसले होते. त्या दरम्यान संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांचे मित्र जयपाल आशोक माने आणि निशांत विष्णु जाविर हे दोघे जण जाधव यांच्या दुकानात आले. या दोघांनी जाधव यांना बाहेर ये सांगितल्यावरसुद्धा जाधव बाहेर गेले नाही. त्यानंतर आरोपी जयपालने हातात लोखंडी कत्ती कपडयात लपवून जाधव यांच्या जवळ गेला आणि कपडा बाजुला फेकुन देवुन दोन्ही हातानी लोखंडी कत्तीने त्यांच्या मानेवर धरत हल्ला केला.
त्यावेळी गोपाळ यांनी हल्लेखोरांना एका हाताने अडवल्यामुळे डाव्या हाताच्या करंगळीवर वार केला. या हल्ल्यानंतर जाधवांनी हल्लेखोरांना ढकलून पळ काढला. मात्र हल्लेखोर जयपाल आणि विष्णु जाबिर हा मोटार सायकलवर बसून कत्ती हातात घेवुन "आज माझा वाढदिवस आहे, तुझा मुळशी पॅटर्न केल्याशिवाय तुला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी देत मोटारसायकलने जाधव यांचा पाठलाग करत होते.
जाधव हल्लेखोरांपासून वाचण्यासाठी मित्राच्या घरी घुसले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोनकरून घडलेली आपबिती सांगितली. जयपाल आशोक माने आणि निशांत विष्णु जाविर या दोन्ही हल्लेखोरांविरोधात तक्रार नोंदवली. या घटनेने बीडमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलीस आरोपींवर कठोर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.