Nashik Crime News: नाशिकच्या सिडको परिसरात गावगुंडांची दहशत; मध्यरात्री अनेक वाहनांची तोडफोड

Nashik Latest Crime News: नाशिकच्या सिडकोतील शिवाजी चौक परिसरात दिवसाढवळ्या खुनाचा घडलेला प्रकार ताजा असतांनाच शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास गावागुंडाची दहशत पाहायला मिळाली.
Nashik Crime News Unknown Persons created and vandalized vehicles in Cidco Area
Nashik Crime News Unknown Persons created and vandalized vehicles in Cidco AreaSaam TV
Published On: 

तबरेज शेख, साम टीव्ही

Nashik Latest Crime News: नाशिकच्या सिडकोतील शिवाजी चौक परिसरात दिवसाढवळ्या खुनाचा घडलेला प्रकार ताजा असतांनाच शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास गावागुंडाची दहशत पाहायला मिळाली. या गावगुंडांनी धुडगूस घालत परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. (Latest Marathi News)

तोडफोडीची घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Nashik Crime News Unknown Persons created and vandalized vehicles in Cidco Area
Fake TC Arrested: अंगात टीसीचा युनिफॉर्म, रुबाबही दमदार; पण एका चुकीने अडकला अन् जेरबंद झाला

यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर अंबड पोलिसांनी (Nashik News) तातडीने गुन्हा दाखल करत दोन संशयितांना अटक देखील केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये गावगुंडांनी शिवाजी चौक परिसरातील अचानक चौक, कृष्णमंदिर मंदिर चौक व इतर परिसरात दुचाकी व चारचाकी वाहणांची तोडफोड केली आहे.

इतकंच नाही, तर एका नामांकित कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला देखील मारहाण करून त्याची दुचाकी फोडली आहे. या गावगुंडांनी काही नागरिकांच्या घरांवर देखील दगडफेक केल्याचे समजते. ही सगळी घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाली आहे.

Nashik Crime News Unknown Persons created and vandalized vehicles in Cidco Area
Mumbai Crime News: मैत्रिणीला खूश करण्यासाठी रोज नविन अ‍ॅक्टिव्हा करायचा चोरी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अचानक झालेल्या प्रकारमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. सिडको परिसरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिसांचा (Police) धाकच उरलेला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागले आहेत.

दरम्यान, सदर प्रकार घडल्यानंतर अनेक नागरिक अंबड पोलीस ठाण्याच्या बाहेर मध्यरात्रीच्या सुमारास जमा झाले होते. तर काहींनी वाहनांची तोडफोड झाल्यानंतर देखील गावगुंडांचा दहशतीमुळे पोलिसांसमोर येणे टाळले होते. पोलीस अटक करण्यात आलेल्या संशयित गावगुंडांची कसून चौकशी करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.