Nashik Crime: दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला.. टोळक्याने तरुणासोबत केलं भयंकर; एकाला अटक

Nashik News: दारु पिण्यास पैसे न दिल्याने ४ ते पाच जणांच्या टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड परिसरात घडला. दिपक भगवंत भुसारे असे या मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Nashik Crime News:
Nashik Crime News: Saamtv
Published On

Nashik Crime News:

दारु पिण्यास पैसे न दिल्याने ४ ते पाच जणांच्या टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड परिसरात घडला. दिपक भगवंत भुसारे असे या मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या मारहाणीत त्याला जबर मार लागला असून सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी, चेहडी येथे मधुकर भिकाजी शिंदे यांचे यश टायर नावाचे दुकान आहे. याच दुकानात दिपक भगवंत भुसारे हा तरुण काम करतो. मंगळवारी (५, डिसेंबर) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास दिपक हा आपल्या सहकाऱ्यांसोबत दुकानात बसलेला होता. त्यावेळी अतिश निरभवने आणि दोघे जण दुकानात आले. त्यांनी दिपककडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

दिपकने पैसे देण्यास नकार दिल्यावर संतापलेल्या आतिश आणि त्याचा सहकारी कुंदन याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्यांनी बराच वेळ अमानुषपणे मारहाण सुरु होती. त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून दिपकच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्नही केला. पण इतरांनी रोखल्याने दिपकचा जीव वाचला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Crime News:
Maharashtra Politics: 'मंत्रीपद नसलं तरी कोट घाला..' वैभव नाईकांची कोपरखळी, गोगावलेंनी थेट ऑफर दिली; ठाकरे- शिंदे गटात जोरदार जुगलबंदी!

या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिपकने दिलेल्या फिर्यादीनुसार अतिश निरभवने सह आणखी दोघांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Nashik Crime News:
Kalyan-Dombivli News:कल्याण-डोंबिवलीसाठी स्वतंत्र धरण?; कुशिवली डॅम आरक्षित करण्याची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com