Kalyan-Dombivli News:कल्याण-डोंबिवलीसाठी स्वतंत्र धरण?; कुशिवली डॅम आरक्षित करण्याची मागणी

Kushivali Dam : गेल्या काही वर्षांपासून कल्याण आणि डोंबिवली शहरांचा अतिशय वेगाने नागरी विस्तार झाला. त्याचा सर्व भार आता मूलभूत सोयी सुविधांवर येऊ लागला असून कल्याण डोंबिवलीतील बऱ्याचशा नव्या गृहसंकुलांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कल्याण डोंबिवलीसाठीच्या स्वतंत्र धरणाची गरज अधोरेखित केली.
 Kushivali Dam
Kushivali Dam Saam Tv
Published On

(अभिजीत देशमुख)

MLA Vishwanath Bhoir Demand Reservation Of Kushivali Dam :

कल्याण डोंबिवलीसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली डॅम आरक्षित करण्याची मागणी केली जात आहे. ही आग्रही मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलीय. ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा विभाग आणि केडीएमसीला तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्वतंत्र धरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हं दिसत आहेत. (Latest News)

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसंदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत समिती सभागृहात झालेल्या या बैठकीत मतदारसंघातील महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही वर्षांपासून कल्याण आणि डोंबिवली शहरांचा अतिशय वेगाने नागरी विस्तार झाला. त्याचा सर्व भार आता मूलभूत सोयी सुविधांवर येऊ लागला असून कल्याण डोंबिवलीतील बऱ्याचशा नव्या गृहसंकुलांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कल्याण डोंबिवलीसाठीच्या स्वतंत्र धरणाची गरज अधोरेखित केली.

अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली धरण कल्याण डोंबिवलीसाठी आरक्षित करावे किंवा या धरणातील पाण्याचा वाढीव कोटा केडीएमसीला देण्याची मागणी आमदार भोईर यांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

जिल्हा आणि केडीएमसी प्रशासनाची एक संयुक्त बैठक घ्यावेत असे निर्देशही त्यांनी दिलेत. या बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कुशिवलि धरणाच्या पाणी साठ्याबाबत जलसंपदा विभागाला तर पुढील तीस वर्षातील केडीएमसीची संभावित लोकसंख्या आणि पाण्याची गरज यासंदर्भात कल्याण कल्याण डोंबिवली महापालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या आजमितीस सुमारे २४ लाखांच्या घरात पोहोचली असून सध्या आपल्याला आवश्यक तितका म्हणजेच प्रतिदिन ४२३ दशलक्षलीटर पाणी पुरवठा होत आहे. पुढील ३० वर्षांचा टप्प्याटप्प्याने विचार करता २०३२ मध्ये लोकसंख्या ३४ लाख ९० हजार आणि प्रतिदिन गरज ६१६ दशलक्षलीटर, २०२४ मध्ये ५० लाख ८८ हजार आणि प्रतिदिन गरज ८९८ दशलक्षलीटर तर २०५२ मध्ये लोकसंख्या ७४ लाख आणि पाण्याची प्रतिदिन गरज १ हजार ३१० दशलक्ष लिटर भासणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भविष्यातील लोकसंख्येचा आणि आकडेवारीचा विचार करता मुबलक पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र धरण आरक्षित करणे ही काळाची गरज बनली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याविषयी अतिशय संवेदनशील असून येत्या काळात कल्याण डोंबिवलीकरांना स्वतंत्र धरण किंवा पाणीसाठ्याच्या वाढीव कोट्याबाबत योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केलाय .

 Kushivali Dam
Kalyan Traffic News: वाहतूक पोलिसांची ट्राफिक वार्डनच्या माध्यमातून वसूली? मनसे आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठवला व्हिडीओ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com