नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडलं
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे सांगून ३० हजार रुपयांची लाच मागितली
१० हजार रुपये स्वीकारताना दोघांनाही रंगेहाथ पकडलं
पोलीस दलात खळबळ
नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिसांना लाच घेताना रंगेहात अटक झाल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांना ACB ने सापळा रचून अटक केली. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका घरगुती वादाच्या प्रकरणात संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली होती. या घटनेमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असे सांगून तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रार दाखल झाल्यानंतर ACB ने त्याची खात्री करण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना दोन्ही आरोपी पोलिसांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. कारवाईदरम्यान एसीबीच्या पथकाने आवश्यक पुरावे गोळा करत दोघांनाही ताब्यात घेतले.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर दोघांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, नाशिक पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे पोलिस विभागात चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.