Taloda News : गुटखा विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल; ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त

Taloda News : तळोदा शहर व तालुका गुजरात हद्दीला लागून असल्याने प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची सर्रास खरेदी विक्री होत असते.
Taloda News
Taloda NewsSaam tv

तळोदा (नंदुरबार) : प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री आणि साठा करणाऱ्या दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. या दुकानदारांकडून सुमारे ९५ हजाराच्या मुद्देमाल जप्त करत या दोन्ही दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई (Taloda) तळोदा शहरात करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Taloda News
Lok Sabha Election : आधी मतदान मग लग्न; अतिदुर्गम भागात लग्नापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

तळोदा शहर व तालुका गुजरात हद्दीला लागून असल्याने प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची सर्रास खरेदी विक्री होत असते. अनेकदा कारवाई होऊन देखील सर्रासपणे वाहतूक व विक्री सुरूच असते. (Gujrat) गुजरात राज्यातील तळोद्यापासून जवळ असलेल्या गावांमध्ये साठा करून खरेदी विक्री करण्यासाठी (Nandurbar) मुद्देमाल शहर व तालुक्यात आणला जात असतो. अशाच प्रकारे तळोदा शहरातील दोन दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Taloda News
Lightning Strike : नळदुर्ग शिवारात विज पडुन दोन बैलाचा मृत्यू; शेतकरी महिलेचे नुकसान

पोलिसांनी (Police) केलेल्या या कारवाईत नगरपालिकेसमोरील दुर्गा किराणा दुकानावरून पोलिसांनी विविध प्रकारचे तंबाखू व गुटक्याचे पाऊच जप्त केले आहेत. याची एकूण किंमत ४३ हजार ९२० रुपये आहे. तर दुसऱ्या कारवाईत एका पीठ गिरणी मालकाकडून ५० हजार ९८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही दुकानदारांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार करीत आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com