४ वर्षांत ५३ बालकांवर लैंगिक अत्याचार; ६४९ व्हिडीओ क्लिप्स, ११०० हून अधिक... राज्यात खळबळ

Nandurbar Child Abuse Case Details And Police Investigation: नंदुरबारमध्ये 53 बालकांवर गेल्या चार वर्षांपासून अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे. पोलिसांनी सुमोटो कारवाई करत 649 व्हिडिओ आणि 1100 हून अधिक फोटो जप्त केले. बालहक्क आयोगाने दखल घेतली आहे.
Nandurbar police investigate a shocking child abuse case involving 53 minors; digital evidence including hundreds of videos and photos seized.
Nandurbar police investigate a shocking child abuse case involving 53 minors; digital evidence including hundreds of videos and photos seized.saam tv
Published On

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदुरबार शहरातून एक अत्यंत सुन्न आणि हादरवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या चार वर्षांपासून अल्पवयीन बालकांवर अत्याचार करणाऱ्या एका नराधमाचा भीषण कारनामा उघडकीस आला आहे. कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता नंदुरबार पोलिसांनी स्वतःहून सुमोटो दाखल करत या प्रकरणाचा छडा लावला आहे. तपासादरम्यान तब्बल 53 बालकांवर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपीकडून 649 हून अधिक व्हिडिओ आणि 1 हजार 100 पेक्षा जास्त फोटो जप्त करण्यात आले आहेत.

नंदुरबार शहरात समोर आलेल्या या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. गेल्या चार वर्षांपासून चिमुकल्या बालकांना आपल्या वासनेचा शिकार बनवणाऱ्या एका विकृत आरोपीला नंदुरबार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोणतीही तक्रार दाखल नसताना पोलिसांनी स्वतःहून 'सुमोटो' गुन्हा नोंदवला आणि तपासाचे चक्र फिरवले. या तपासात आरोपीच्या मोबाईल आणि डिजिटल उपकरणांमधून 53 हून अधिक बालकांवरील अत्याचाराचे 649 व्हिडिओ आणि 1 हजार 100 हून अधिक फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलीस कोठडीत असलेल्या या आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू असून, या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पीडित बालकांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Nandurbar police investigate a shocking child abuse case involving 53 minors; digital evidence including hundreds of videos and photos seized.
Crime : घर दाखवण्याच्या बहाण्याने झुडपात नेलं अन् ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; शेजाऱ्याचं भयंकर कृत्य

या भीषण प्रकरणामुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे समोर आला आहे. आरोपीच्या या कृत्यामागील मानसिक विकृती पाहून संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून, सामाजिक कार्यकर्त्यांनी या विकृताला कठोरात कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे.

Nandurbar police investigate a shocking child abuse case involving 53 minors; digital evidence including hundreds of videos and photos seized.
Crime News: १४ वर्षीय मुलीवर बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल राज्य बालहक्क आयोगाने घेतली आहे. अत्यंत संवेदनशीलतेने स्वतःहून गुन्हा दाखल केल्याबद्दल बालहक्क आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांनी नंदुरबार शहर पोलिसांचे कौतुक केले आहे. तपासात कोणतीही तांत्रिक चूक राहू नये आणि आरोपीला न्यायालयात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी दोषारोपपत्र सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तसेच पीडित बालकांची ओळख गुप्त राहील आणि माध्यमांमध्ये ती उघड होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. एकीकडे पोलीस या डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करत आहेत, तर दुसरीकडे या पुराव्यांच्या आधारे आणखी काही पीडित मुलांची नावे समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बालकांवर होणाऱ्या कोणत्याही अनैतिक किंवा बेकायदेशीर कृत्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही बालहक्क आयोगाने केले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com