सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच (Nandurbar) जिल्ह्याभरात चांगल्या पावसाची संततधार आहे. यामुळे शेतकरी (Farmer) सुखावला असून आता पेरण्यरंची लगबग सुरू झाली आहे. (Breaking Marathi News)
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. अशातच काल सकाळच्या सत्रात पाऊस झाल्यानंतर पाऊस थांबल्याचे चित्र होते. मात्र आज सकाळापासून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा आणि शहादा तालुक्यातील सर्वदूर दमदार पावसाच्या सरी बरसत आहेत. या पावसामुळे शेतीसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
बळीराजाची लगबग
आज आषाढीचा उत्सव आणि त्यातच पावसाच्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सलग दोन दिवस (Rain) पाऊस झाल्याने शेतकऱ्याची लगबग देखील वाढली आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या देखील आता सुरू झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.