Gondia News: सात राईस मिलर्स तीन वर्षाकरिता काळ्या यादीत; तांदळाचा काळा बाजाराचा केंद्रीय पथकाकडून पर्दाफास

सात राईस मिलर्स तीन वर्षाकरिता काळ्या यादीत; तांदळाचा काळा बाजाराचा केंद्रीय पथकाकडून पर्दाफास
Gondia News
Gondia NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख

गोंदिया : तांदूळ नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्‍ह्याच्या देवरी तालुक्यातील सात राईस मिलर्सला तीन वर्षाकरिता (Gondia) काळ्या यादीत टाकण्यात आले. पुढचे तीन वर्ष या सातही राईस मिलर्सला शासकीय धान्याची भरडाई करता येणार नाही. त्यामुळे (Rice) राईस मिल मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

Gondia News
Ashadhi Ekadashi: तुळशीच्या पानावर साकारले विठुराया; एक इंचाच्‍या पानावर ऍक्रेलिक रंगाचा वापर

गोंदिया जिल्हा मार्केटींग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंळाने गोंदिया जिल्‍ह्यात खरेदी केलेल्या शासकीय धान्याची भरडाई करते. यासाठी गोंदिया जिल्‍ह्यातील इतर राईस मिलर्ससह देवरी तालुक्यातील वसंत राईस मिल डोगरगाव, तिरुपती राईस मिल देवरी, महाराष्ट्र एग्रो इंडस्ट्री चिचगड, मा भगवती राईस इंडस्ट्री देवरी, इंडियन फूड प्रॉडक्ट चिचगड, बालाजी राईस मिल बोरगाव बाजार तसेच माँ शक्ती राईस इंडस्ट्री देवरी यांच्याशी धान्य भरडाईचा करार केला आहे.

Gondia News
Navapur Accident News: एकुलता एक मुलगा गेल्‍याने कुटुंबाचा आधार गेला; नवापूरला भीषण अपघातात युवकाचा मृत्‍यू

भरडाई केलेला तांदूळ देवरी तालुक्यात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यलयाने भाड्याने घेतलेल्या आशु गोदामात एप्रिल २०२२ मध्ये जमा केला होता. त्यावेळी तांदूळ गुणवत्ता अधिकारी म्हणून सतीश अगडे यांनी या सातही राईस मिलर्सने जमा केलेला २७ लॉट तांदळाची गुणवत्ता तपासून तांदूळ जमा केला होता. मात्र ७ मेस आशु गोदामात तांदूळ तपासणीकरिता आलेल्या केंद्रीय पथकाने हा तांदूळ मानवी खाण्यास योग्य नसल्याचे सांगत या तांदळाला रद्द करीत सातही राईस मिलर्सला तीन वर्षाकरिता शासकीय धान्याची भरडाई करता धान्य देऊ नये; म्हणून काळ्या यादीत टाकण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकरी चिन्मय गोतमारे यांनी दिली आहे.

Gondia News
Nagpur Crime News : सोशल मिडीयावर ओळख; नोकरीचे आमिष देत महिलेवर सामुहिक अत्‍याचार

तर दुसरीकडे जिल्हा पुरवठा कार्यलयाने देवरी तालुक्यात एप्रिल २०२२ ला नियुक्त केलेले तांदूळ गुणवत्ता अधिकारी सतीश अगडे यांनी तांदळाची गुणवत्ता तपासून सातही राईस मिलर्सचा तांदूळ गोदामात जमा करून घेतला होता. दुसरीकडे याच तांदळाला केंद्रीय पथकाने मानवी खाण्यास हा तांदूळ योग्य नसल्याचे सांगत कोट्यवधी रुपयांचा २७ लॉट तांदूळ रद्द करीत या सातही राईस मिलर्सकडून नवीन तांदूळ जमा करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकर्यांना दिल्या आहेत. त्यामुळे तत्कालीन तांदूळ गुणवत्ता अधिकारी सतीश अगडे यांनी तांदूळ जमा करताना खरंच हा तांदूळ कुठल्या पद्धतीने तपासून घेतला होता. जो आज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे यांच्या कार्यप्रणालीवर राईस मिलर्सने प्रश्‍न चिन्ह निर्माण करीत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तांदूळ नगरी म्हणून नाव लौकिक आलेल्या गोंदिया जिल्‍ह्यात अधिकऱ्यांच्या संगनमताने राईस मिलर्स मानवी खाण्यास योग्य नसलेला तांदूळ शासकीय तांदूळ गोदामात जमा करीत असल्याचा केंद्रीय पथकाच्या तपासात उघड आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com