बापरे मध्‍यरात्री घरात घुसला बिबट्या; हल्‍ल्‍यात बकरी ठार

बापरे मध्‍यरात्री घरात घुसला बिबट्या; हल्‍ल्‍यात बकरी ठार
Leopard Attack Nandurbar News
Leopard Attack Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील धवळी विहीर येथील शकुंतला नाऱ्या पावरा यांच्या घरात रात्री बारा वाजेच्या दरम्यान बिबट्याने (Leopard) बकरीवर हल्ला करून ठार केली आहे. यावेळी कुटूंब गाढ झोपेत होते. (Nandurbar News leopard Attack)

Leopard Attack Nandurbar News
Solapur News : शिक्षिकेशी लगट, माजी महापाैरांच्या आली अंगलट; गुन्हा दाखल

धवळी विहिर येथील पावरा (Nandurbar) कुटूंब हे घरात झोपलेले होते. मध्‍यरात्रीच्‍या सुमारास बिबट्या अचानक घरात शिरला. यावेळी हल्‍ला केल्‍यानंतर (Leopard Attack) बिबट्या व बकरीच्या झटापटीने घरातील सदस्य जागे झाले. आरडाओरड केल्यानंतर बिबट्या तेथून पळाला. मात्र बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात बकरी ठार झाली आहे.

वारंवार होतात हल्‍ले

परिसरात वारंवार वन्य प्राण्यांचे हल्ले होत असून. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चाचे तालुका अध्यक्ष दारासिंग वसावे यांनी वन विभागाला संपर्क करून सदर कुटुंबाला आर्थिक मदत दिली जावी; अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com