सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यातील शहादा तालुक्यात कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या काही भागात सोमवारी देखील जोरदार पाऊस झाला. दरम्यान आज सकाळपासून देखील पावसाचा जोर कायम असून वादळी वाऱ्यामुळे गेल्या आठ तासांपासून शहादा तालुक्यातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झालेला आहे. जोरदार पावसामुळे (Heavy Rain) मंदाना आणि सावखेडा परिसरामध्ये नदी नाल्यांना पूर आला असून वाहत्या पाण्यामधून आपली वाहने काढत असताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
जोरदार वारा असल्या कारणाने अनेक ठिकाणी विजांचे खांब देखील पडले आहेत. यामुळे या परिसरात (Shahada) असलेल्या केळी आणि पपई पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या आठ तासापासून खंडित असलेल्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक आता चांगलेच हैराण झालेले आहेत. सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यात एकूण ३५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.