Ashadhi Wari : कोंडण्यापुरची माता रुक्मिणी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; ४५ दिवसांची वारी

Amravati News :पुढील महिन्यात आषाढी एकादशी आहे. पंढरीच्या वारीची आस वारकऱ्यांना लागून आहे. महाराष्ट्रातून पंढरपूरला जाणाऱ्या आषाढीची पालखी वारी निघण्यास आता सुरवात
Ashadhi Wari
Ashadhi WariSaam tv

अमर घटारे 
अमरावती
: विदर्भाची पंढरी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूरातील माता रुक्मिणीच्या माहेरची पालखी आषाढी एकादशीनिमित्ताने सासरी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. रुक्मिणीच्या पालखीचे यंदाचे ४३० वे वर्ष आहे. 

Ashadhi Wari
Cyber crime : डॉक्टराची ऑनलाईन फसवणूक; सैन्यदलातील जवानांच्या तपासणीच्या नावे सव्वा लाखात गंडविले

पुढील महिन्यात आषाढी एकादशी आहे. पंढरीच्या वारीची आस वारकऱ्यांना लागून आहे. महाराष्ट्रातून पंढरपूरला (Amravati) जाणाऱ्या आषाढीची पालखी वारी निघण्यास आता सुरवात झाली आहे. यात महाराष्ट्रातील सर्वांत पहिली पालखी म्हणून कोंडण्यापूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीची विशेष ओळख आहे. ४५ दिवसांचा १८०० किलोमीटरचा पायी प्रवास करून पालखी १४ जुलैला पंढरपूरमध्ये (Pandharpur) दाखल होणार आहे, या पालखी पायी वारीला आजपासून सुरवात झाली. 

Ashadhi Wari
Dhule News : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्यासह बैलजोडी ठार; शेतात काम करताना घडली घटना

पंढरपूरला (Ashadhi Wari) आषाढी एकादशीला कौडण्यापूर येथील रुक्मिणीच्या पालखीला विशेष मान असतो. याच ठिकाणावरून माता रुक्मिणीचे श्रीकृष्णाने हरण केले होते; अशी अख्ययिका आहे. दरम्यान आज मुसळधार पावसातही शेकडो भाविक पायदळ टाळ, मृदुंगाच्या गजरात फुगडी खेळत प्रचंड उत्साहात भाविक दंग झाले होते. यावेळी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com