Nandurbar: ढोरपाडा लघु मध्यम प्रकल्प ओवर फ्लो

ढोरपाडा लघु मध्यम प्रकल्प ओवर फ्लो
Nandurbar Rain
Nandurbar RainSaam tv
Published On: 

नंदुरबार : नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर्वपट्ट्यातील ढोर पाडा, बर्डीपाडा आणि गडदानी गावांच्यावर डोंगराच्या पायथ्याशी असलेला लघु मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून गेला आहे. या धरणाच्या (Nandurbar News) सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असून सरपणी नदीला महापूर आला आहे. (Nandurbar news Dhorpada Small Project Overflow after heavy rain)

Nandurbar Rain
Nandurbar: नागपूर– सुरत महामार्ग बंद; पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प

ढोरपाडा या प्रकल्पातून येणाऱ्या पूराच्या पाण्यामुळे (Heavy Rain) राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडीजवळ मोठ्या पूलाचे काम सुरू असून वाहनांना येण्याजाण्यासाठी तात्पुरता तयार केलेला कच्चा पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्हाधिकारी व नवापूर (Navapur) तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.

पुरामुळे घराची पडझड

ढोरपाडा लघु मध्यम प्रकल्प मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. ढोरपाडा गावात मुसळधार पावसाने पोहल्या गावित यांच्या घराची पडझड झाली आहे. घरात कोणीही नसल्याने जीवित हानी टळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.