Nandurbar: नागपूर– सुरत महामार्ग बंद; पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प

नागपूर– सुरत महामार्ग बंद; पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प
Nandurbar Rain
Nandurbar RainSaam tv
Published On: 

नंदुरबार : नवापूर तालुक्यातून जाणारा नागपूर– सुरत राष्ट्रीय महामार्ग विसरवाडी गावाजवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. यामुळे महामार्गावर (Nandurbar News) दुतर्फा वाहनांच्‍या रांगा लागल्‍या आहेत. (Nandurbar news Nagpur Surat highway closed Traffic jam due to water flowing over the bridge)

Nandurbar Rain
Nandurbar: विसरवाडी खांडबारा पूर्व पट्ट्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्‍कळीत

नवापूर (Navapur) तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असून नागण, सरपणी, नेसू नदींना मोठा पूर आला आहे. गावागावातून नद्यांना आलेल्या पुरामुळे विसरवाडी जवळील राष्ट्रीय महामार्गावरील कच्च्या स्वरूपात बनवण्यात आलेल्या पर्यायी पुलावरून पाणी जात असल्याने महामार्ग बंद झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत.

पर्यायी पुलावरून पाणी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गेल्या आठ वर्षापासून चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. विसरवाडी गावाजवळ नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता म्हणून माती टाकून पूल बनवण्यात आला आहे. या पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही बाजूने वाहनांना थांबवून सुरक्षा देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.