नंदुरबार : नळाला पाणी आल्याने घरातील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या इसमाला विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील कळंबू या गावात घडली आहे. संजय बोरसे असे मृत व्यक्तीचे नाव असून गावातील प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. .
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील कळंबू गावातील प्रगतिशील शेतकरी संजय आत्माराम बोरसे (वय ५८) हे सकाळी शेतात गेले होते. दरम्यान दुपारी शेतातून घरी आल्यावर ते घरातील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले. यावेळी त्यांना विजेचा जोरदार झटका (Electric Shock) लागून ते बाजूला फेकले जाऊन बेशुद्ध पडले. घडला प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांना ताबडतोब शेजारील व कुटुंबाच्या मदतीने उपचारासाठी शहादा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. साठे यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करण्यात आले. मृत बोरसे हे गावात व परिसरात प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित होते. दुर्दैवी घटनेमुळे परिवार व गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सारंगखेडा पोलिसांत रामराम बोरसे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.