Nandubar Crime News: एटीएम कॅश पुरवठा करतांना रोकड लांबविली; व्हॅनमधील कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Nandurbar News एटीएम कॅश पुरवठा करतांना रोकड लांबविली; व्हॅनमधील कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला
Nandubar Crime News
Nandubar Crime NewsSaam tv

सागर निकवाडे 
नंदुरबार
: बॅकेच्या एटीएम मशीनमध्ये कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनवरील कर्मचाऱ्यानेच व्हॅनमधील (Nandurbar) रोकडवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात साधारण १ कोटीपेक्षा अधिकची (ATM) रक्कम लांबविली आहे. (Breaking Marathi News)

Nandubar Crime News
Sambhajinagar Fraud Case: एक लाखात कोटींचा पाऊस; फसवणूक करणारा भोंदू ताब्यात, तरुणाला ३ लाखांचा गंडा

नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरातला प्रकार घडला आहे. रायटर कॉर्पोरेशन कंपनीच्या व्हॅन मधली रोकड लांबविली आहे. एसबीआयच्या एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी आज व्हॅन जात होती. या दरम्यान रस्त्यात एका फायनान्स कंपनीचे कॅश कलेक्शनसाठी व्हॅन थांबली असतांनाच दुचाकीने जावून (Crime News) पोलीस मुख्यालयातील एटीएममध्ये कॅश भरुन येतो; असे म्हणून व्हॅनमधली कॅश काढून कर्मचारी गेला तो परतलाच नाही. 

Nandubar Crime News
Wardha Congress: वर्धा लोकसभा काँग्रेसलाच हवी; कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी

जिल्हाभरात नाकाबंदी 

सदर कर्मचारी कॅश व्हॅनमधील १ कोटी ५ लाखांची रोकड घेवून कर्मचारी फरार झाला आहे. या प्रकारानंतर तब्बल दोन तासांनी पोलीसांशी संपर्क साधला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असून आरोपीच्या शोधासाठी जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com