Accident News: साखरपुडा आटोपून घरी जाताना अपघात; दोन वाहनांच्‍या धडकेत १५ जखमी

साखरपुडा आटोपून घरी जाताना अपघात; दोन वाहनांच्‍या धडकेत १५ जखमी
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

नवापूर (नंदुरबार) : सूरतहून साखरपुडा आटोपून मालेगावला जात असताना रात्री अकराच्या सुमारास अपघात (Accident) झाला. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्‍याने यात १५ प्रवाशी जखमी झालेत. यात दोन महिलांची प्रकृती गंभीर आहे. (Maharashtra news)

Accident News
एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (१३ नोव्‍हेंबर) रात्री अकरा वाजेच्या सुमारास (Navapur) नवापूर तालुक्यातील प्रतापपूर गावाजवळ दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात मालेगावच्‍या दिशेने जात असलेल्‍या क्रुझर वाहनातील १५ प्रवासी जखमी (Accident News) झाले आहेत. जखमीना खासगी रुग्णवाहिका (Ambulance) जीवनधाराचे पायलट लाजरस गावीत यांनी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवले. अपघात होताच दोन्ही चालक फरार झाले आहेत.

दोन महिलांची प्रकृती गंभीर

प्रतापपूरजवळ कार व क्रुझर गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण १५ प्रवासी जखमी झाले. यातील दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व अपघातग्रस्त मालेगाव तालुक्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com