शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराची मस्ती जिरवायची, भाजपच्या आमदाराची उघड धमकी, नेमकं प्रकरण काय?

Shiv sena vs BJP : विजयकुमार गावित यांनी आमश्या पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी या आमदारांवर गंभीर आरोप केले. गावित यांनी सांगितले की, शिंदे आमदारांची मस्ती जिरवायची आहे आणि त्यांच्या कुटुंबाने पंतप्रधान आवास योजनेचा गैरवापर केल्याचा आरोप केला.
Eknath Shinde
Maharashtra Politics Saam Tv
Published On
Summary
  • भाजपा आमदार गावित यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर गंभीर आरोप करत उघड धमकी दिली.

  • गावित यांनी घरकुल योजनेचा गैरवापर झाल्याचा आरोप केला.

  • चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रत्युत्तरात गावित यांना भ्रष्ट मंत्री म्हणून सडकून टीका केली.

  • महायुतीतील भाजपा व शिंदे गटामध्ये वाढलेली दरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे

Nandurbar BJP vs Shiv Sena clash over housing scheme : भाजप आमदार परिणय फुकेंनी शिवसेनेचा (शिंदे गट) बाप काढल्यामुळे महायुतीमध्ये आधीच तणाव वाढला होता. आता त्यात आणखी भर पडली आहे. भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांनी आता शिंदेंच्या आमदाराची मस्ती जिरवण्याची भाषा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद चव्हाट्यावर येत आहे. महायुतीमधील या प्रमुख दोन पक्षांमधील दरी वाढत असल्याची चर्चा आहे. परिणय फुकेंनी बाप काढल्यानंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली होती. फुकेंनी माफी मागत यावर पडदा टाकला, पण आता गावित यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. नंदुरबारमध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार-कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.

शिंदे आमदाराची मस्ती जिरवायची - डॉ विजयकुमार गावित

मला शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांची मस्ती जिरवायची आहे. नंदुरबार जिल्ह्यात महायुती करु नका, असे पक्ष श्रेष्ठींना सांगितले असल्याचे भाजपा आमदार डॉ विजयकुमार गावित म्हणाले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातच महायुतीमधल्या घटक पक्षामधील आमदारामध्येच वाक युद्ध सुरू झाले आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना भाजपा आमदार माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित हे शिंदे गटाच्या आमदारांवर चांगलेच घसरले. आमदार आमश्या पाडवी करदाते असताना, त्याच्या पत्नीच्या नाववार 14 घरे असताना त्यांच्या पत्नी आणि मुलाने पंतप्रधान आवास योजना आणि शबरी घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप डॉ विजयकुमार गावितांनी केला आहे. त्यामुळे आमदारांच्या पत्नी आणि मुलाने घरकुलाचा लाभ घेतल्याचा थेट आरोप डॉ विजयकुमार गावितांनी केल्याने महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपा शिंदे गटाचे आमदार एकमेकाचे उणेदुणे काढताना दिसत आहे.

Eknath Shinde
IT कर्मचाऱ्याला बलात्कार प्रकरणात अडकवलं, RBL बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचं ब्लॅकमेलिंगचं षडयंत्र

शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे प्रत्युत्तर, सडकून टीका

देशात आदिवासी खात्यात सर्वाधीक भ्रष्टाचार करणारा मंत्री म्हणून डॉ विजयकुमार गावित परिचित आहे. त्यांनी इतके पाप करुन देखील त्याचे काहीही वाकडे झाले नाही. त्यामुळे आमच्या सारख्या माणसांच्या खोट्या तक्रारी करुन आमचे काय बिघडणार, असा टोला शिंदे गटाचे विधान परिषद आमदार चंद्रकांत ऱघुवंशी यांनी डॉ गावितांना लगावला आहे. डॉ विजयकुमार गावितांसारखा पापी माणूस आमच्यावर बोलत असेल तर दूध का दूध पाणी का पाणी होईलच, असे चंद्रकांत रघुवंशी म्हणाले आहेत.

Eknath Shinde
Nagpur Vande Bharat : नागपूर-पुणे वंदे भारतचे वेळापत्रक आले, ९ स्थानकावर थांबणार, कोणकोणत्या जिल्ह्यांना होणार फायदा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com