Accident: ​तापी नदीच्या पुलावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; वाढदिवसाच्या दिवशीच चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू

Nandurbar Car And Bike Accident: नंदूरबारमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. भरधाव कारने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातामध्ये तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.
Accident: तापी नदीवरील पुलावर अपघाताचा थरार, कारची दुचाकीला धडक, वाढदिवशीच चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू
Nandurbar AccidentSaam Tv
Published On
  • तापी नदी पुलावर भीषण अपघात

  • नंदुरबारच्या तळोदामध्ये घडली घटना

  • कार आणि दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

  • वाढदिवशीच चिमुकल्याचा अपघातात मृत्यू

सागर निकवाडे, नंदूरबार

नंदूरबारमध्ये तापी नदीवरील पुलावर भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ५ वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश असून वाढदिवसाच्या दिवशीच त्याचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबारच्या तळोद्याजवळ असलेल्या गुजरात राज्यातील हातोडा पुलाच्या वळणावर ही अपघाताची घटना घडली. कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या हातोडा येथील तापी नदी पुलावर हा थरारक अपघात झाला.

Accident: तापी नदीवरील पुलावर अपघाताचा थरार, कारची दुचाकीला धडक, वाढदिवशीच चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव पिकअप उलटला; २ मुलांसह १२ जणांचा मृत्यू

तापी नदीवरील पुलावर आज दुपारच्या सुमारास कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरून प्रवास करणारे दोघेही दूरवर फेकले गेले. या अपघातामध्ये जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जयपालसिंग भारतसिंग गिरासे (वय २६ वर्षे) आणि निरजकुमार कल्याणसिंग गिरासे (वय ५ वर्षे) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. दोघेही नंदूरबारच्या बलवंड याठिकाणी राहणारे होते.

Accident: तापी नदीवरील पुलावर अपघाताचा थरार, कारची दुचाकीला धडक, वाढदिवशीच चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू
Accident News : रेल्वेचा भीषण अपघात! क्रॉसिंगजवळ ट्रेन-बसची एकमेकांना जोरदार धडक, ८ जणांचा मृत्यू

धक्कादायक म्हणजे, आजच चिमुकल्या निरजकुमारचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात निकिता गिरासे यांच्यासह कारमधील चालक आणि एक महिला गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नंदुरबार येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच निझर आणि तळोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. वेग आणि बेफिकीर वाहन चालवण्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Accident: तापी नदीवरील पुलावर अपघाताचा थरार, कारची दुचाकीला धडक, वाढदिवशीच चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू
Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! ठाकरेसेनेच्या नेत्याच्या कारच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com