Nanded Crime : गावातील महिलेने चिमुकलीला दोन दिवस ठेवले डांबून; नरबळीचा संशय, महिलेसह दोनजण ताब्यात

Nanded News : मुलगी घरी न आल्याने तिच्या आई- वडिलांनी तिचा शोध घेतला. मात्र मुलगी सापडली नाही. यामुळे तिच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार माळाकोळी पोलीस ठाण्यात दिली होती.
Nanded Crime
Nanded CrimeSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी
नांदेड
: सात वर्षांच्या चिमुकलीला गावातीलच एका महिलेने दोन दिवस डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांनी या चिमुकलीचा तपास लागला असून या प्रकरणी महिलेसह दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान अघोरी विद्या किंवा नरबळीच्या उद्देशाने महिलेने हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. 

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील परांडा या गावातून प्रांजली कदम ही सात वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. २० जानेवारीला प्रांजली शाळेतून बाहेर पडली आणि बेपत्ता झाली होती. मुलगी घरी न आल्याने तिच्या आई- वडिलांनी तिचा शोध घेतला. मात्र मुलगी सापडली नाही. यामुळे तिच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार माळाकोळी पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. 

Nanded Crime
Hingoli News : अंगदुखीवर आयुर्वेदिक उपचार घेतले अन् घडला भलताच प्रकार; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

दोन जणांनी नेले होते उचलून 

गावातीलच महिला शोभाबाई गायकवाड (वय ५५) हिने त्या मुलीला दोन दिवस घरात डांबून ठेवले होते. २० जानेवारीला सायंकाळी साडे चार वाजता प्रांजली शाळेतून येत असताना दोन दुचाकीस्वारांनी तिला उचलून नेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला असता शोभाबाई गायकवाड हिचे नाव समोर आलं. यानंतर महिलेच्या ताब्यात असलेल्या मुलीची सुटका करण्यात आली. 

Nanded Crime
Sangli Crime : घरफोडीतील तिघे संशयित जेरबंद; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

महिलेसह दोन जण ताब्यात 

पोलिसांनी शोभाबाई गायकवाड या महिलेसह इतर दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र मुलीचे अपहरण नरबळी किंवा अंधश्रद्धा या कारणावरून करण्यात आले होते का किंवा इतर कारणासाठी मुलीचे अपहरण करण्यात आले होते? याचा तपास पोलीस करीत आहेत. नरबळीसंबंधी अजून ठोस असा पुरावा मिळाला नसल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com