Nanded
Nanded Accident Saam tv

Nanded Accident : गणेश भक्तांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ३ जण जागीच ठार

Nanded Accident News : नांदेडमध्ये गणेश भक्तांचा अपघात झाला. या ट्रक-कार अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत.
Published on
Summary

नांदेडमध्ये एका दिवसात दोन मोठे अपघात

नांदेडमध्ये एक कार आणि ट्रक अपघात, दुसरा एसटी बस अपघात

कार अपघातात गणपती दर्शनावरून परतणाऱ्या ३ भाविकांचा मृत्यू

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड : नांदेडमध्ये अपघाताची मालिका सुरुच आहे. नांदेडच्या देगलूरनंतर भोकरमध्ये अपघाताची घटना घडली. उभ्या असलेल्या ट्रकला कारची जोराची धडक दिली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. गणपतीचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. अपघातातील मृत्यू झालेले सर्व तेलंगणामधील आहेत.

Nanded
OBC Reservation : मोठी बातमी! ओबीसी समाजासाठी उपसमितीची स्थापना; यादीत कोणत्या मंत्र्यांची वर्णी, वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमधून अपघाताची दुसरी घटना समोर आली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन परत जाणारी एक कार उभ्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात तीन जागीच ठार झाले आहेत. मृत सर्व तेलंगणा राज्यातील निजामबाद जिल्ह्यातील बोधन येथील रहिवासी आहेत. भोकर तालुक्यातील नांदा म्है.प. येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली.

Nanded
IAS Transfers List : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरुच; कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

देगलूरमध्ये एसटी बसचा अपघात

नांदेडच्या देगलूरमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील बेलूर येथे हा अपघात घडलाय. हाणेगाववरून देगलूरकडे ही बस जात होती. बेलूरजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली.

Nanded
Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक; राज्यातील २ रेल्वे मार्गाला ग्नीन सिग्नल, वाचा सविस्तर

या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले. तर यातील ३ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गंभीर जखमी प्रवाशांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एसटी बसची वाहक सुरेखा शिंपाळे या देखील या अपघातात जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी प्रवाशांवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर इतर किरकोळ प्रवाशांवर देगलूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com