

संतोष जोशी
Viral Video : नांदेडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणाचा नाचता नाचता मृत्यू झालाय. सदर घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. (Latest Viral Video)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी येथील मुत्तेन्ना जामगेवाड हा तरुण तेलंगणातील पार्डी येथे नातेवाईकाच्या लग्नात गेला होता. लग्नाच्या रात्री उशिरा कार्यक्रमात तेलगू चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स करत होता. मात्र अचानक त्याला हृदयविकाराचा झडका आला आणि क्षणात होत्याचं नव्हचं झालं.
मुत्तेन्नाच्या या घटनेचा व्हिडिओ एका कॅमेऱ्यात कैद झाला आहे.व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण लग्नात खुप आनंदी आहे. आपला आनंद व्यक्त करत तो बराच वेळ एकटाच नाचत असतो. वेगवेगळ्या स्टेप्स करून दाखवत तो डान्स करतो. अशात अचानक त्याच्या छातीत कळ येते आणि तो धाडकन खाली आदळतो.
डान्स पाहणाऱ्यांना सुरवातीला तो मसकरी करत स्वत:च पडला असेल असे वाटते. मात्र थोडावेळ वाटपाहूनही तो उठला नसल्याने नातेवाईक जवळ जाऊन पाहतात तेव्हा त्याला त्रास होत असल्याचं समजतं. त्यानंतर नातेवाईक तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करतात.
मात्र मुतेन्नाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टर सांगतात. मुतेन्नाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबासह नांदेडच्या शिवणी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. हसत्या-खेळत्या लग्नघरात असा प्रकार घडल्याने लग्नघरात दु:खाचं वातावरण पसरलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.