Police viral video : लईच भारी! रोके ना रुके नैना...; पोलीस जवानाचं गाणं ऐकून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध

स्टेजवर बसून गिटार वाजवत पोलीस जवानाने गायलेलं हे गाणं ऐकून सर्वच मंत्रमुग्ध झालेत.
Police viral video
Police viral videoSaam TV
Published On: 

Police viral video : सोशल मीडियावर नेहमीच अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात. यात काही व्हिडिओ असे असतात की, ज्यांचे मोठे कौतुक होते. पोलिसांची प्रतिमा सगळ्यांचा नजरेत सारखी आहे. कुठेही काहीही चुकीचं घडलं की पोलिसांची आधी आठवण होते. आपल्या कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना नेहमीच अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशात पोलीस फार कठोर मनाचे असतात असा काहींचा समज माज आहे. मात्र एका पोलीस जवानाने हा समजत खोडून काढला आहे. (Police Singing a song)

आपल्या कर्तव्यावर असताना दिल्ली पोलिसांमधील एका पोलीस जवानाने एक सुंदर गाणं गायलं आहे. वरून धवल आणि आलीय भट्ट या दोघांचा बद्री की दुलहानिया या प्रसिद्ध चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत. त्यातील एक रोके ना रुके नैना या गाण्याने चांगलीच हवा केली होती.

Police viral video
Viral Video : नाद करा पण आमचा कुठं...; पठ्यानं कोल्हापुरी चपलेलाही टाकलं मागे, पाय पडताच होईल विषारी दंश

पोलिस जवानाने देखील हेच गाणं गायलं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका भव्य कार्यक्रमात पोलिसांचा फौज फाटा तैनात आहे. यामध्ये उपस्थित व्यक्तींचे रक्षण करण्याबरोबर एक पोलीस जवान रोक ना रुके नैना हे गाणं गात आहे. स्टेजवर बसून गिटार वाजवत पोलीस जवानाने गायलेलं हे गाणं ऐकून सर्वच मंत्रमुग्ध झालेत.

Police viral video
Dog and Snake Viral Video : चित्तथरारक! सापाने दंश करताच कुत्र्याने त्याला कचाकच चावलं; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल...

गाणं पूर्ण झाल्यावर उपस्थितांनी पोलिसावर कौतुकाचा आणि टाळ्यांचा वर्षाव केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे. सर्वत्र याच व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिस भावड्याची कामगिरी आणि त्यांच्या सुरांच सगळेच कौतुक करत आहेत.

पोलिसांच्या कामगिरीच्या अनेक बातम्या समोर येत असतात. जीवाची बाजी लावून गुन्हेगारांना पकडणारे पोलीस हे देखील एक माणूस आहेत आणि इतर व्यक्तींप्रमाणे त्यांच्यात देखील आनंद, प्रेम या भावना आहेत. पोलिसाने हे गाणं गाताना सगळ्यांच्या मनात आपली छाप उमटवली आहे. या व्हिडिओला आता नेटकरी सेल्युट आणि कौतुकाच्या कमेंट येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.