

आता बातमी आहे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गुंडगिरीची. तहसील कार्यालयात तक्रार करायला आलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदारनं जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण या नायब तहसीलदाराचा संतापजनक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालय. नेमकं काय आणि कुठं झालाय हा प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट.
जनतेचे सेवक असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हा माज नीट पाहा. सातबारा उताऱ्यावरील जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका सामान्य शेतकऱ्याची नायब तहसीलदारानं थेट क़ॉलर पकडलीय. मी इथलाच आहे काय करायचे ते कर असं म्हणत नायब तहसीलदार शेतकऱ्याला धमकावत असल्याचंही समोर आलयं. पुन्हा एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहा.
बालाजी शिंदे हे शेतकरी आपल्या 7/12 वरील 2 आर जमीन कमी झाल्याबाबत विचारणा करण्यासाठी नांदेडच्या लोहा तहसील कार्यालयात गेले. मात्र त्यांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी नायब तहसीलदार राजेश पाठक यांच्याकडून अपमान सहन करावा लागलाय...बालाजी शिंदेंनी नेमके काय आरोप केले ऐका. दुसरीकडे साम टीव्हीच्या प्रतिनिधीनं नायब तहसीलदार राजेश पाठक यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी या प्रकरणी काय उत्तर दिलयं...ऐका..
एकीकडे नायब तहसीलदारांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असले तरी शेतकरी बालाजी शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केलीय...मुळात तक्रारीवर तोडगा निघत नसेल तर वरिष्ठांकडे पाठवा. मात्र आपल्याच कार्यालयात थेट तक्रारदार शेतकऱ्याची कॉलर पक़डून धमकावणं कितपत योग्य आहे? याआधी ही अनेक ठिकाणी तहसीलदार, नायब तहसीलदार शेतकऱ्यांची पिळवणुक करत असल्याच्या आणि भ्रष्टाचाराच्या अनेक घटना समोर आल्यात....मात्र आता हे अधिकारी जर थेट नागरिकांना कॉलर पकडून दमदाटी करत असतील तर अशा माजोरड्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.