ठाकरेसेनेचे सहा खासदार फुटल्याने राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं असतानाच विधान परीषदेच्या निकालाशीही त्याचं कनेक्शन दिसून येतंय. नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमर राजुरकर यांनी मोठा विजय मिळवलाय. मात्र भाजपचा विजय सुकर करण्यासाठीच ही आष्टीकरांनी आपला मुलगा कृष्टा पाटील आष्टीकर यांना रिंगणात उतरवलं होतं. आणि याची रणनीती आधीच आखल्याची चर्चा आता रंगलीय. कारण नांदेडच्या जागेसाठी आधी काँग्रेसच्या रामदास पाटील सोमठाणकर यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा मुलगा कृष्णा आष्टीकर इच्छुक होते. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या रामदास पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली आणि महाविकास आघाडीकडून कृष्णा आष्टीकर हे अधिकृत उमेदवार झाले. मात्र वडील खासदार नागेश पाटील शिंदेसेनेते गेले असले तरी आपण ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याची ग्वाही कृष्णा आष्टीकरांनी निकालापूर्वी दिली होती.
मात्र आता पराभवानंतर कृष्णा आष्टीकरांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. मात्र विधान परिषद निवडणुकीत कुणाला किती मतं मिळाली आहेत ते पाहूयात...भाजपच्या अमर राजुरकर यांना 339 मतं मिळाली. तर ठाकरेसेनेतून निवडणूक लढवणाऱ्या कृष्णा आष्टीकरांना फक्त 84 मतं मिळाली. या निवडणुकीत 23 मतं बाद झाली आहेत. भाजपचे विजयी उमेदवार अमर राजुरकर यांनी विजयाची हॅटट्रीक केली आहे. ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठीच कृष्णा आष्टीकर रिंगणात होते, अशी चर्चा सुरु आहे.
भाजपच्या या सोप्या विजयामुळे खासदार नागेश पाटील-आष्टीकरांनी आधीपासूनच मविआ आणि ठाकरेसेनेला कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आता रंगलीय. मुलाच्या खांद्यावरुन नेम साधत ठाकरे सेनेचा गेम केल्याचं राजकीय विश्वात बोबलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.