Nana Patole On BRS: बीआरएसचे रेट ठरलेले, पैश्यांच्या भरवश्यावर काम सुरु; नाना पटोले यांची टीका

Congress Leaders On BRS: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन दिवस सोलपवर दौऱ्यावर आहेत.
Nana Patole
Nana PatoleSAAM TV
Published On: 

Solapur News Today: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन दिवस सोलपवर दौऱ्यावर आहेत. आज नाना पटोले हे आपल्या परिवारासह आई तुळजाभवानी आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे दर्शन घेणार आहेत. सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांनी नाना पटोले यांचा सत्कार केला. यावेळी नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसोबत बीआरएसवर देखील निशाणा साधला. (Latest Marathi News)

Nana Patole
Beed News: लग्नाआधी 7 जन्माचं वचन देणाऱ्या पतीचा खरा चेहरा उघड; प्रेमविवाहानंतर अवघ्या 3 महिन्यात पत्नीनं जीवन संपवलं

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची BRS वर गंभीर टीका केली आहे. BRS चे रेट ठरलेले असून पैश्यांच्या भरवश्यावर काम सुरु आहे. BRS च्या प्रवेशाने काँग्रेसला कोणताही फरक पडणार नसल्याच विधान नाना पटोले यांनी केलं आहे.

ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर प्रश्न विचारले असता नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रासाठी आता हे काही नवीन राहिलेले नाही. मोदी सरकार हे ईडी आणि सीबीआयचं दुरुपयोग करत आहे, हे लपलेलं नाही. जे कोणी विरोध करतील त्यांच्या विरोधात ईडी (ED) आणि सीबीआय चौकशी लावू, त्यांच्यावर दबाव आणू, त्यांच्यावर कारवाई करू, त्यानंतर त्यांना आमच्या पक्षात घेऊ आणि स्वच्छ करू ही भाजपची भूमिका आहे असे देखील नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

Nana Patole
Ashadhi Ekadashi Shubh Muhurt: 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल...', यंदा आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी व वेळ

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, आमच्या नेत्या सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्ष आहेत. नितीश कुमार समन्वयक असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीचे नेतृत्व सोनिया गांधी करत आहेत. बीजेपीच्या विरोधातील जी सर्व लोक आहेत. त्यांना एकत्रित करण्यासाठी ही आजची बैठक आहे. भाजप विरोधात देशामध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रचंड चिड आहे. 2014 आणि 2019 मध्ये ज्या घोषणा दिल्या होत्या त्याची पूर्तता झालेली असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.