Nashik Road Accident Latest Updates: नाशिक-शिर्डी बस अपघातात ४ वर्षांची श्रध्दा मृत्युमुखी, ७ मृतांची ओळख पटली

या अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Nashik Bus Accident, Ambernath, Kalyan
Nashik Bus Accident, Ambernath, Kalyansaam tv

Nashik Road Accident Latest Updates : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिरानजीक आज (शुक्रवार) झालेल्या आराम बस आणि ट्रक अपघातात (Nashik Truck Bus Accident News) दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चार वर्षाच्या एका मुलीचा (girl) समावेश आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सात जणांची ओळख पटली असून उर्वरित तीन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती प्रशासनाने दिली.

Nashik Bus Accident, Ambernath, Kalyan
MSRTC Bus Accident : प्रवाशांचे प्राण वाचविण्यात चालकास यश; चंद्रपूर - आंबाजोगाई बसला अपघात, ३० जखमी

प्रशासनानकडून मिळालेल्या माहितीनूसार या ८ महिला आणि पुरुष तर २ मुलांचा मृत्यू झाला आहे. सुमारे वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात (hospital) उपचार सुरु आहेत.

अपघातातील मृतांची नावे

प्रमिला प्रकाश गोंधळी (वय-४५, अंबरनाथ)

वैशाली नरेश उबाळे (वय ३२, अंबरनाथ)

श्रावणी सुहास बारस्कर (वय ३०, अंबरनाथ)

श्रध्दा सुहास बारस्कर (वय ४, अंबरनाथ)

नरेश मनोहर उबाळे (वय ३८, अंबरनाथ)

बालाजी कृष्णा मोहंती (वय-२५, ड्रायव्हर)

दिक्षा संतोष गोंधळी (वय १८, कल्याण)

उर्वरित तीन जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. (Nashik Shirdi Accident Latest Marathi News)

Nashik Bus Accident, Ambernath, Kalyan
Nashik Road Accident: नाशिक अपघातात १० मृत्यू; CM शिंदेंकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

एकूण प्रवाशी ४५

मृत्यू १०

ओळख पटलेले ०७

अनोळखी ०३

अपघातग्रस्तांवर पुढील रुग्णालयात उपचार सुरू

मातोश्री हॉस्पिटल ०३

डॉ. साळुंखे हॉस्पिटल ०१

यशवंत हॉस्पिटल १६

एकूण २० प्रवाशांवर उपचार सुरू असून सिन्नर रुग्णालयातून चार प्रवाशांना (passengers) उपचारानंतर सोडण्यात आले आहे अशी माहिती प्रशासनाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com