Nalasopara Crime News: नालासोपाऱ्यातील रुग्णालयात सुरू होता धक्कादायक प्रकार; अचानक अधिकारी धडकले अन्...

नालासोपाऱ्यातील रुग्णालयात सुरू होता धक्कादायक प्रकार; अचानक अधिकारी धडकले अन्...
Nalasopara Crime News Illegal Abortion Center
Nalasopara Crime News Illegal Abortion CenterSaam Tv
Published On: 

Nalasopara Crime News: नालासोपारा मधील प्रसिद्ध डॉक्टर शशिबाला शुक्ला यांना बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवत असल्याचे उघड झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करून या बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी डॉ शुक्ला यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेच्या विजय नगरमध्ये डॉ शशीबाला शुक्ला यांचे आशिर्वाद क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. त्या डीएटएमस असून गेली ३५ वर्ष हा दवाखाना चालवत आहेत. मात्र ते या दवाखान्यात बेकायदेशीररित्या गर्भपात केंद्र चालवत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती.

Nalasopara Crime News Illegal Abortion Center
Pm Modi America Visit: 'एक भविष्य, एक पृथ्वी, एक व्यक्ती', पंतप्रधान मोदींचा योग दिनी अमेरिकेत नारा

त्यानुसार वैदकीय वैद्यकीय विभागाचे डॉ पंडीतराव राठोड, डॉ अनाया देव, डॉ कृपाली फर्डे, मनोज यादव यांनी स्टिंग ऑपरेशन केले. डॉ. शुक्ला यांच्याकडे एक डमी रुग्ण पाठवला. डॉ शुक्ला यांनी कुठलीही सोनोग्राफी न करता त्यांना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यांना रंगेहाथ पथकाने पकडल्यानंतर तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. डॉ शुक्ला यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात कलम ४२० , बेकायदेशीर गर्भपात अधिनियम, औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन तसेच वैद्यकीय गर्भ समाप्ती अधिनियम २००३ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

गर्भपाताच्या गोळ्या फक्त एमबीबीएस स्त्रीरोगतज्ञ देऊ शकतो. परंतु डॉ शुक्ला यांच्याकडे कुठलही शैक्षणिक पात्रता नसल्याने त्या बेकायेदशीरपणे रुग्णांना गर्भपाताच्या गोळ्या देत होत्या. त्या ॲलोपॅथीच्या प्रॅक्टीसही करत होत्या. अशा प्रकारे गोळ्या देणे रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं, अशी माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी दिली.

Nalasopara Crime News Illegal Abortion Center
Darshana Pawar Death Case: दर्शनाच्या मारेकऱ्यांना लवकर शोधून कठोर शिक्षा द्या, कुटुंबियांची मागणी

गेली ३५ वर्ष त्या क्लिनिक चालवत आहे. त्यामुळे हा प्रकार गेली अनेक वर्ष सुरू असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली नागरिकांनी केवळ अधिकृत स्त्रीरोगतज्ञांकडूनच गर्भपातासंदर्भात उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ चौधरी यांनी केेले आहे.

दरम्यान, याप्रकरणी रात्री अडीच वाजता गुन्हा दाखल झाला आहे. आज कायदेशीर पडताळणी करून पुढील प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com