Darshana Pawar Death Case: दर्शनाच्या मारेकऱ्यांना लवकर शोधून कठोर शिक्षा द्या, कुटुंबियांची मागणी

Darshana Pawar Case Latest Update: पोलिसांना चौकशीदरम्यान राजगडाजवळील एका हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक केलं.
Darshana Pawar Death Case
Darshana Pawar Death Casesaam tv
Published On

Darshana Pawar Death Case : राजगड किल्ल्याच्या पायथ्याला मृतावस्थेत सापडलेल्या दर्शना पवार हिचा खून झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. दर्शनासोबत राजगड येथे गेलेला तिचा मित्र राहुल हंडोरे हा देखील तेंव्हापासून बेपत्ता आहे. दर्शना पवार ही मूळ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची असून बेपत्ता राहुल हंडोरे हा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शहा गावाचा रहिवासी असल्याचं तपासातून समोर आलंय.

MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शनाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून कठोर शिक्षा द्याववी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. घटना घडल्यापासून दर्शनासोबत असलेला तिचा मित्र राहुल हंडोरे हा बेपत्ता आहे. त्यामुळे पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Darshana Pawar Death Case
Pune Crime News: पुणे हादरलं! रिक्षाचालकाचा इंजिनिअर तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी ताब्यात

राहुल नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी

राहुल हंडोरे हा नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर सिन्नर तालुक्यातील शहा गावाचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याच्या घराला कुलूप असून घरी शुकशुकाट असल्याचं आढळून आले आहे. राहुलचा शोध लागल्यानंतरच हत्येचा उलगडा होणार आहे. (Marathi Tajya Batmya)

राहुल हंडोरे नेमका कुठे आहे?

पोलिसांना चौकशीदरम्यान राजगडाजवळील एका हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राहुल हंडोरे दर्शनासोबत राजगडा जाताना दिसत आहे. मात्र खाली येताना राहुल एकटाच दिसत आहे. त्यामुळे संशयाची सुई आता राहुल हांडोरेकडे वळली आहे. राहुलच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन परराज्यात दाखवलं गेलं आहे. तसेच राहुलच्या खात्यावरून काही एटीएम व्यवहार झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. (Crime News)

Darshana Pawar Death Case
Ahmednagar News: शिक्षकाची १२ वर्षांनी बदली, विद्यार्थीच नाही तर अख्खं गाव रडलं; हृदयस्पर्शी VIDEO

पोलिसांची ५ पथकं घेताय शोध

राहुलच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहेत. पोलीस राहुल हंडोरेच्या जवळच्या लोकांची देखील चौकशी करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. राहुलचा फोन सध्या बंद आहे, त्यामुळे तो नेमका कुठे आहे याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com