Nanded Crime News: पाेलिसांच्या सतर्कतेमुळे लाखाे रुपयांची चाेरी टळली, ATM मशीन फोडताना युवकास पकडले

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Nanded Crime News
Nanded Crime Newssaam tc

- संजय सूर्यवंशी

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडताना एका चोरट्यास पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पाेलिसांनी त्यास अटक केली आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरु असल्याची माहिती तपासी अधिकारी ओमकांत चिंचोलकर यांनी दिली. (Maharashtra News)

Nanded Crime News
Adulteration In Milk : नंदूरबारकरांना मिळतंय भेसळयुक्त दूध, 9 विक्रेत्यांवर कारवाई; 334 लिटर दूध नष्ट

पहाटेच्या सुमारास गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या एटीएम मशिनच्या चाेरीची घटना लक्षात आली. त्यांनी तात्काळ संशयितास ताब्यात घेतलं. यामुळे लाखो रुपयांची चोरी टाळण्यात पोलिसांना यश आले.

Nanded Crime News
NCP vs NCP : यापुढं काकांचा फाेटाे बॅनरवर वापरणार नाही! पुतण्याने दिली ग्वाही; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अनिल श्रीमंगले असे संशयिताचे नाव आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहित्य आणि एक आधुनिक मशीन जप्त करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com