Nagpur : महिलेला बिअर शॉप मालकाला विकलं, पोर्तुगालमध्ये घरात कोंडून अत्याचार, धक्कादायक घटनेने नागपूरमध्ये खळबळ

Nagpur News : युरोपमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे स्वप्न दाखवून नागपूरच्या २८ वर्षीय महिलेची पोर्तुगालमध्ये मानवी तस्करी केल्याचा आरोप. ११ लाख रुपयांची फसवणूक; पुणे पोलिसांचा तपास सुरू.
Nagpur Woman Trafficked To Portugal | Human Trafficking Case
Nagpur Woman Trafficked To Portugal | Human Trafficking CaseSaam Tv
Published On
Summary
  • नागपूरच्या २८ वर्षीय महिलेची पोर्तुगालमध्ये मानवी तस्करी

  • युरोपमध्ये दीड लाख रुपये पगाराच्या नोकरीचे स्वप्न दाखवून तिच्याकडून ११ लाख रुपये उकळले

  • सुपरमार्केटच्या नोकरीऐवजी बिअर शॉप मालकाला विकल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप

  • या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल असून पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे

नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. युरोपमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे स्वप्न दाखवत नागपूरच्या २८ वर्षीय महिलेची पोर्तुगालमध्ये मानवी तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका कन्सल्टन्सीमार्फत महिलेकडून तब्बल ११ लाख रुपये उकळले असून, याप्रकरणी पुणे विमानतळ पोलिस ठाण्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या तक्रारीनुसार, युरोपमध्ये दरमहा सुमारे दीड लाख रुपयांच्या पगाराची नोकरी देण्याचे स्वप्न तिला दाखवण्यात आले होते. कॅशिअरची नोकरी देण्याचे सांगून तिला पोर्तुगालला पाठवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर तिचा पासपोर्ट काढून घेण्यात आला आणि दोन दिवस एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.

Nagpur Woman Trafficked To Portugal | Human Trafficking Case
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

त्यानंतर सुपरमार्केटमध्ये नोकरी देण्याऐवजी पोर्तुगालमधील एका बिअर शॉप मालकाला तिला विकल्याचा गंभीर आरोप महिलेने केला आहे. संबंधित व्यक्तीच्या घरी ठेवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. ‘तुला खरेदी करण्यासाठी भारतातील एजंटना पैसे दिले आहेत,’ असे त्या व्यक्तीने सांगितल्याचा महिलेचा दावा आहे.

Nagpur Woman Trafficked To Portugal | Human Trafficking Case
Rain Update : राज्यात विजांसह मुसळधार पाऊस, नाशिकसह ७ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; वाचा हवामानाचा अंदाज

महिनाभर नरकयातना सहन केल्यानंतर महिलेने २९ जून रोजी पोर्तुगालमधून पळ काढला. बसने लिस्बनहून माद्रिद गाठल्यानंतर दोहा मार्गे ती भारतात परतली. भारतामध्ये परतल्यानंतरही आरोपींनी माल्टामध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली आणखी तीन लाख रुपयांची मागणी केली आणि तिच्या पतीलाही धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्राजक्ता भाभा अनिलकुमार, अनहर शेख, वामन, टैतल्य, हिम्मतसिंग आणि कपिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून या कथित आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या नेटवर्कचा तपास सुरू असून, तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com