भारत नागणे, पंढरपूर प्रतिनिधी
Warkari from Nagpur beaten during Ashadhi Ekadashi queue in Pandharpur : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभं असलेल्या वारकऱ्याला बीव्हीजी कंपनीच्या खासगी सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीत भाविक रक्तबंबाळ झाला. गोपाळपूर रोडवरील पत्राशेड येथील दर्शन बारीतील आज सकाळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनाच्या रांगेत उभं असलेला भाविका हा नागपूर येथील होता. त्याला खासगी सुरक्षा रक्षकाने काठीने बेदम मारहाण केली. भाविकाला झालेल्या मारहाणीचा भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षारक्षावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मारहाणीची घटन समोर आल्यानंतर सुरक्षारक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सध्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. पालख्यांचे आगमन झाल्याने विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. मंदिर समितीने दर्शनासाठी व्यवस्थित रांगेची सोय केली असून, ही रांग गोपाळपूर पत्रा शेडपर्यंत पोहोचली आहे. या रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्याला किरकोळ कारणावरून बीव्हीजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाने मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली. यापूर्वीही मंदिर समितीने नेमलेल्या सुरक्षारक्षक एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी भाविकांना मारहाण, शिवीगाळ आणि पैसे घेऊन रांगेत प्रवेश दिल्याच्या घटना घडल्या होत्या.
यावेळी मंदिर समितीने बीव्हीजी या आंतरराष्ट्रीय कंपनीला सुरक्षेची जबाबदारी दिली. मात्र, ठेका मिळाल्याच्या अवघ्या दहा दिवसांतच या कंपनीच्या रक्षकाने वारकऱ्यावर हात उगारल्याने वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या प्रकरणी बीव्हीजी कंपनीचे स्थानिक व्यवस्थापक देशमुख यांनी संबंधित सुरक्षारक्षकाला माफी मागण्यास सांगून नोकरीवरून काढल्याचे समजतेय. आता मंदिर समिती यावर काय कारवाई करणार, याकडे सर्व वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.