Shocking : नागपूरच्या शिक्षकाचा दुर्दैवी अंत! माकडाकडून बॅग घ्यायला गेले अन् १५० फूट खोल दरीत कोसळले

Nagpur Teacher Death News : मध्य प्रदेशातील पचमढी येथे माकडाने बॅग हिसकावल्याने ती परत मिळवण्याच्या प्रयत्नात नागपूरचे शिक्षक विजय नायक १५० फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Nagpur Teacher Falls Pachmarhi News
Nagpur Teacher Falls Pachmarhi News AI Image
Published On: 
Summary
  • मध्य प्रदेशातील पचमढी येथे दुर्दैवी घटना

  • नागपूरच्या शिक्षकाचा १५० फूट खोल दरीत पडून मृत्यू

  • माकडाने बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती परत मिळवताना शिक्षकाचा तोल गेला

मध्य प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पचमढी येथे फिरण्यासाठी गेलेल्या नागपूरच्या एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माकडाने हिसकावलेली बॅग परत मिळवण्याच्या प्रयत्नात शिक्षकाचा तोल गेला आणि ते थेट १५० फूट खोल दरीत कोसळले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार त्यांच्या वडिलांसमोरच घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय नायक (वय ४४, रा. भगवाननगर, नागपूर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते नागपूरमधील रामदासपेठ येथील सोमलवार शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून काम करत होते. शाळेतील सुमारे २० विद्यार्थ्यांच्या समूहासोबत ते पचमढी येथे सहलीसाठी गेले होते. यावेळी त्यांचे वडील हरिदास नायक हे देखील त्यांच्यासोबत होते. शुक्रवारी सकाळी विजय नायक हे प्रियदर्शिनी व्ह्यू पॉइंट येथे फोटो काढत होते. त्याचवेळी एका माकडाने त्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

Nagpur Teacher Falls Pachmarhi News
Political News : मोठी बातमी! खासदारांच्या घराची रेकी केली अन् मध्यरात्री हल्ला करून फरार; भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

माकडाकडून बॅग परत मिळवण्यासाठी विजय नायक पुढे गेले. मात्र, या प्रयत्नात ते कठड्याच्या पलीकडे गेले आणि अचानक त्यांचा तोल गेला. काही क्षणांतच ते सुमारे १५० फूट खोल दरीत कोसळले. ही घटना त्यांच्या वडिलांच्या डोळ्यांसमोर घडली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, घटनास्थळापर्यंत पोहोचण्याचा रस्ता अत्यंत अवघड आणि दुर्गम असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी आल्या.

Nagpur Teacher Falls Pachmarhi News
Gold Rate Today : लक्ष्मीपूजनापूर्वी सोन्याच्या दरात मोठा बदल; १ तोळा सोन्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k,22k,24k चे ताजे दर

पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे तीन किलोमीटर पायी चालावे लागले. त्यानंतर बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. तब्बल साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर स्ट्रेचरच्या मदतीने विजय नायक यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे नागपूरमधील त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच सहलीसाठी गेलेले विद्यार्थी आणि शिक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.