Nagpur Latest Crime News : हायप्रोफाईल धरमपेठ परिसरात २८ वर्षीय रेस्टॉरंट मालक अविनाश भुसारी यांची धडाधड गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. मध्यरात्री दीड वाजता अविनाश भुसारी (Avinash Bhusari shot dead) हे मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते, त्यावेळी अचानक दुचाकीवरून ४ जण आले अन् ६ राऊंड फायर केल्या. या हल्ल्यामध्ये अविनाश भुसारी गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. अवघ्या २८ व्या वर्षीय अविनाश भुसारी यांनी जगाचा निरोप घेतला. हायप्रोफाईल धरमपेठ परिसरात तरुण उद्योजकाची हत्या झाल्यामुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अविनाश भुसारी यांच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत या घटनेचा सखोल तपास करत आहेत. अविनाश भुसारी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यामुळे नागपूरमधील कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. धरमपेठ आणि परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण आहे. अविनाश भुसारी यांची हत्या का केली? नेमका उद्देश काय होता? पैशाचे काही कारण होते का? की दुसरं कुणी दगाफटका केला? याचा शोध अंबाझरी पोलिसांकडून घेतला जात आहे.
मृत अविनाश भुसारी यांचं नागपूर उच्चभ्रू धरमपेठ परिसरात 'सोशा' नावाचे रेस्टॉरंट आहे. सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अविनाश भुसारी हे बाजूच्या 'निंबस लौंज' चे मालक रस्त्यावर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अचानक २ दुचाकीवरून ४ आरोपी आले आणि अविनाश भुसारी यांच्यावर बेछूट गोळीबार केला. अज्ञात हल्लेखोरांनी अविनाश यांच्यावर ६ राऊंड फायर केल्या. या हल्ल्यात अविनाश गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अविनाश भुसारी यांना मित्रांनी तात्काळ जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केल. पण तोपर्यंत उशीर झाला होता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अविनाश भुसारी यांच्यावर आरोपींनी सहा गोळ्या धाडल्याची माहिती अंबाझरी पोलिसांनी दिली. काही महिन्यांपूर्वी नागपुरातील पवन हिरणवार या कुख्यात गुन्हेगाराचा खून करण्यात आला होता. या खुनाच्या घटनेतूनच अविनाश भुसारी यांची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत अविनाश भुसारी हा रेस्टॉरंट चालवत होता. त्याच्यावर कुठल्याही गुन्हेगार केसेस नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली. या प्रकरणे पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. अविनाश भुसारी यांच्यासोबत घटनास्थळावर असणाऱ्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.