Husband kill wife over affair suspicion : नवरा आणि बायको, दोघांनाही सरकारी नोकरी.. उच्च पदावर कामावर होते. ती नागपूरला तर तो रायपूरमध्ये कामाला. दोघेही प्रोफेसर पण डोक्यात संशायचे भूत घुसले अन् नात्याचा शेवट झाला.
कामानिमित्त शहराबाहेर राहणाऱ्या नवऱ्याच्या डोक्यात संशयाचे भूत गेले अन् तिथेच नात्याला उतरती कळा लागली. त्याच संशायातून बायकोच्या हत्येचा प्लान केला, त्याला भावाने मदत केली. नागपूरमधील हे हायप्रोफाईल हत्याकांड आज उघडकीस आले. आरोपी डॉ. अनिल राहुले याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अर्चना अनिल राहुले याच्या हत्येप्रकरणी पोलीस अनिल यांची चौकशी करत आहेत.
अर्चना अनिल राहुले या नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी विभागातील असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या. तर त्यांचा पती रायपूरमध्ये सरकारी रूग्णालयात प्रफोसर म्हणून कामाला होता. अनिल यांनी प्लान करून बायकोचा खून केला अन् हत्या झाल्याचं भासवले. पण पोलिसांनी एका झटक्यात नवऱ्याचा भंडाफोड केला.
लाडेकर ले-आउट, हुडकेश्वर येथे राहणाऱ्या अर्चना अनिल राहुले यांचा अतिशय क्रूर पद्धतीने खून केला. रक्ताच्या थारोळ्यात अर्चना यांचा मृतदेह आढलल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अर्चना यांच्या डोक्यावर रॉडने वार केले होते, हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. नागपूरमधील हुडकेश्वर पोलिसांनी याप्रकरणी तपस सुरू केला आहे. अर्चना यांची हत्या करण्यासाठी अनिल याला त्याच्या भावाने मदत केल्याचे पोलिसांच्य तपासात समोर आले आहे.
अनिल राहुले हे रायपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कामाला आहेत. ते आठवड्यातून एक-दोन दिवसच नागपुरात येत असतात. आपल्या मागे बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय त्यांच्या डोक्यात आला, त्यातूनच त्यांनी बायकोला संपवण्याचा प्लान केला. शनिवारी सायंकाळी अनिल नागपुरात आले. घरी पोहोचल्यानंतर त्यांना घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी चक्रे फिरवली. पोलिसांच्या तपासात नवरा अनिलच दोषी असल्याचे आढळले आहे. चारित्र्याच्या संशायवरून अनिलने बायकोचा जीव घेतलेला असू शकतो. घराबाहेर राहत असल्याचा फायदा घेत बायकोचा जीव घेतल्यानंतर बनाव केला. पण नागपूर पोलिसांनी नवऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.