Nagpur Crime: नागपूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार, २८ वर्षीय तरुण उद्योजकाची गोळ्या झाडून हत्या

High-Profile Killing in Nagpur: नागपूरमध्ये २८ वर्षीय तरुण उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या चौघांनी तरुणावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
Nagpur Crime
Nagpur Crime Saam Tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये एका तरुण उद्योजकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागपुरमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात ही घटना घडली. २८ वर्षीय तरुण उद्योजकाची हत्या करण्यात आल्यामुळे नागपुरमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात गोळीबार करून तरुण उद्योजकाची हत्या करण्यात आली. नागपुरमधील पॉश समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री हा रक्तरंजित थरार घडला. 'सोशा रेस्टॉरंट'चे मालक अविनाश भुसारी (२८ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. धरमपेठ परिसरात रात्री दीड वाजताच्या सुमारास अविनाश भुसारी हे बाजूच्या 'निंबस लौंज' चे मालक आणि त्यांचा मित्रासोबत रस्त्यावर बसले होते.

Nagpur Crime
Nashik Crime : मौजमजेसाठी सोनसाखळी, दुचाकी चोरी; टोळीसह सोनं खरेदी करणारा सराफ व्यावसायिकही ताब्यात

अविनाश आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी चार आरोपी दोन मोटरसायकलवरून त्याच्या जवळ आले आणि त्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. अविनाश यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गोळी लागल्यामुळे अविनाश गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर उपचारासाठी अविनाश भुसारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयामध्ये पोहचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Nagpur Crime
Crime News: पोलिसांच्या नाकावर टिच्चून कुख्यात गुंडाने दिले कायद्याला आव्हान|VIDEO

घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर पंचनामा करून पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या चारही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. हायप्रोफाइल आणि तरुण उद्योजकाची हत्या झाल्यामुळे नागपुरमध्ये खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime
Beed Crime: तुझ्यासकट चार ते पाच जणांना उडवतो', नागरिकांना संताप; टेम्पो चालकाला बेदम फोडला | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com