Nagpur Accident : एकाला वाचवण्याचा नादात दुसऱ्याचा गेला जीव; नागपुरातील मन हेलावून टाकणारी घटना

गावर काटा आणणारी ही थरारक घटना (Accident) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Nagpur Katol Accident
Nagpur Katol AccidentSaam TV

काटोल : नागपुरातील (Nagpur) काटोल तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली. सावरगाव जांब नदीच्या पुलावर अचानक दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नांदात कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. ब्रेक मारताच हा दुचाकीस्वार बचावला. पण कंटेनरचा मागील भाग पूर्णपणे विरुद्ध दिशेने गेल्याने त्याची एका तरुणाच्या बाईकला धडक बसली. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. (Nagpur News Today)

Nagpur Katol Accident
Bus Accident : पालघरमध्ये दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या; अपघातात २० ते २५ प्रवासी जखमी

अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना (Accident) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. योगेश रमेश रिठे असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. अपघातात कंटेनर चालक आणि वाहक देखील जखमी झाले आहेत. एकाला वाचवण्याच्या नांदात दुसऱ्या तरुणाचा जीव गेल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार सावरगाव जांब नदीपलीकडे मृत योगेशची शेती आहे. रविवारी नेहमीप्रमाणे योगेश हा आपल्या शेतात गेला होता. शेतातून परत येत असताना, गळपुरा चौकाकडून सावरगाव रोडकडे एक कंटेनर येत होता. त्यावेळी एक दुचाकीचालक रस्त्याच्या मधोमध आला. त्याला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने ब्रेक दाबले. (Nagpur Katol Accident Latest News)

Nagpur Katol Accident
Nagpur Crime : १५ वर्षीय विद्यार्थीनीवर स्कूल व्हॅनचालकानेच केला अत्याचार; काळिमा फासणारी घटना

अचानक ब्रेक दाबल्याने कंटेरनरचा समोरील भाग विरुद्ध दिशेने सरकला. त्यामुळे कंटेनरचा मागील भाग हा योगेशच्या दिशेने आला. कंटेरनच्या माघच्या भागाची योगेशच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कंटेनरचा समोरील भाग पुलाखाली गेला आणि योगेशची दुचाकी त्यात फसली.

या अपघातात योगेशला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचार सुरू असताना योगेशचा मृत्यू झाला. या अपघातात कंटेनरचे चालक आणि वाहक दोन्हीही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com