Nagpur Crime : १५ वर्षीय विद्यार्थीनीवर स्कूल व्हॅनचालकानेच केला अत्याचार; काळिमा फासणारी घटना

नागपुरात एका स्कूल व्हॅन चालकाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.
Nagpur Crime
Nagpur CrimeSaamTv News

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर (Nagpur Crime) शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नागपुरात एका स्कूल व्हॅन चालकाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. तब्बल २५ दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. (Nagpur Crime News Today)

Nagpur Crime
Nagpur : शेतात गवत कापायला गेला, पुन्हा परतलाच नाही; बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

पवन कोहपरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी पवन हा स्कूल व्हॅनचालक आहे. पीडित १५ वर्षीय विद्यार्थीनी अनेक दिवसांपासून त्याच्याच व्हॅनमधून शाळेचा प्रवास करीत होती. स्कूल व्हॅनचालक आणि पीडित मुलगी अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते.

१५ ऑक्टोबर रोजी आरोपीने संधीचा फायदा घेत आरोपीने पीडितेवर बलात्कार (Crime News) केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करत असताना आरोपीने व्हिडीओ क्लिपही बनवली होती.

या क्लिपच्या आधारे आरोपी पवन हा पीडित मुलीला ब्लॅकमेल करत होता. आरोपीच्या कृत्याला कंटाळून अखेर पीडितेने घडलेली सर्व हकीकत आपल्या आई-वडिलांना सांगितली. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच, त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पवन कोहपरे याच्याविरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. शालेय मुलीवर स्कूल व्हॅनचालकाने अत्याचार केल्याचं उघड होताच, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com