Bus Accident : पालघरमध्ये दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या; अपघातात २० ते २५ प्रवासी जखमी

पालघरच्या जव्हारमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.
Palghar ST Bus Acciodent
Palghar ST Bus AcciodentSaam Tv

Palghar ST Bus Acciodent : पालघर जिल्ह्यातून अपघाताची एक भंयकर घटना समोर आली आहे. पालघरच्या (Palghar) जव्हारमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे.

Palghar ST Bus Acciodent
Pabhani Crime : नांदायला येत नाही म्हणून पतीचं पत्नीसोबत भयावह कृत्य; परभणीतील धक्कादायक घटना

जखमींना तातडीने जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, नाशिक सिलवासा आणि जळगाव सिलवासा या दोन एसटी बस समोरासमोर (Bus Accident) धडकल्या. आज सकाळच्या सुमारास जव्हार सिल्वासा मार्गावरील जयसागर डॅमजवळ हा अपघात झाला आहे.

अपघात इतका भीषण होता की, दोन्ही एसटी बस अक्षरश: चिरडल्या गेल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. जखमींवर सध्या जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com