Nagpur News: सरकारी वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाचे आमिष; ५२ लाखात फसवणूक

सरकारी वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाचे आमिष; ५२ लाखात फसवणूक
Nagpur News
Nagpur NewsSaam tv
Published On: 

नागपूर : मुलीला वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश मिळवून देतो; म्हणून तब्बल ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना (Nagpur) नागपुरात उघडकीस आली. तामिळनाडूच्या ठगबाजानी नागपूरच्या पालकाला हा गंडा (Fraud) घातला असून या प्रकरणी तामिळनाडूच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

Nagpur News
Pandharpur News: विठुरायाची तुळशी पुजा पुन्‍हा होणार सुरु; आठ वर्षांपासून बंद होती पुजा

नागपूरातील ओमप्रकाश वंदेवार असं फसवणूक झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी हे सलुनचा व्यवसाय करत असून त्यांच्या मुलीने नीटची परीक्षा पास केली. मात्र मार्क काहीशे कमी असल्याने तिला सरकारी कोट्यात प्रवेश मिळाला नाही. म्हणून वडील प्रयत्नात असताना त्यांना तामिळनाडूच्या (Tamilnadu) एकाचा नंबर मिळाला.

यानंतर ओमप्रकाश यांनी संपर्क साधला असता त्याने तामिळनाडूच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दिले. त्यासाठी ओमप्रकाश यांच्याकडून तामिळनाडूच्या तिघांनी तब्बल ५२ लाख रुपये घेतले. मात्र पैसे देऊनही प्रवेश मिळाला नाही. यामुळे अखेर नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार दिली. यात तिघांवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com