Pandharpur News: विठुरायाची तुळशी पुजा पुन्‍हा होणार सुरु; आठ वर्षांपासून बंद होती पुजा

विठुरायाची तुळशी पुजा पुन्‍हा होणार सुरु; आठ वर्षांपासून बंद होती पुजा
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv

पंढरपूर : महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची तब्बल आठ वर्षांपासून तुळशी‌पूजा बंद होती. मात्र ही पुजा गुढीपाडव्यापासून पुन्हा सूरू होणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीत तुळशी पूजा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (letest Marathi News)

Pandharpur News
Nagpur News: देह व्यापारातील दलाल अटकेत; पोलिसांचा हॉटेलवर छापा

सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये विठ्ठल मंदिरातील बडवे उत्पातांचे पूजा करण्याचे अधिकार रद्द करून मंदिराचे सरकारीकरण करण्यात आले. तेव्हापासून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची पूजा ही मंदिर समितीने नियुक्त केलेल्या पूजार्यांकडून केली जाते. पूर्वी पासूनच मंदिरात पहाटेची काकड आरती, त्यानंतरची महापूजा, धूप आरती, पाद्यपूजा, तुळशी पूजा अशा पूजा केल्या जातात.

दरम्यान मंदिरातील देवाची पूजा करण्याचे बडवे उत्पातांचे अधिकार संपुष्टात आल्यानंतर इतर पूजा परंपरेनुसार सुरू आहेत. मात्र पूर्वीपासूनच चालत आलेली तुळशी पूजेची परंपरा २०१४ पासून खंडीत झाली होती. तब्बल आठ वर्षांपासून बंद असलेली तुळशी पूजा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोना‌ काळात मंदिर काही महिने बंद होते. या काळात मंदिरात भाविकांकडून केल्या जाणार्या सर्वच पूजा बंद होत्या. मागील वर्षी मंदिर सुरू झाल्यानंतर पुन्हा मंदिरातील पूजा सुरू करण्यात आल्या आहेत. विठुरायाच्या महापूजेसाठी जवळपास एक वर्षासाठी आधीच भाविकांनी‌ बुकींग केले आहे. भाविकांच्या मागणीनुसार आता मंदिर समितीने तुळशी पूजा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पूजा मराठी नवीन वर्षापासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होणार असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com