Nagpur News: देह व्यापारातील दलाल अटकेत; पोलिसांचा हॉटेलवर छापा

देह व्यापारातील दलाल अटकेत; पोलिसांचा हॉटेलवर छापा
Nagpur News
Nagpur NewsSaam tv
Published On: 

नागपूर : मॉडलिंग करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तरुणींना देह वापराच्या दलदलीत ढकलून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाला (nagpur) नागपूर गुन्हे शाखेने अटक केली. तो एका मोठ्या हॉटेलमध्ये ग्राहकांकडे तरुणी पाठवत असल्याचं या तपासात उघड झालेला आहे. (Breaking Marathi News)

Nagpur News
Jalna Crime News: अपघातात मृत्यूचा बनाव; चुलत भावाने कट रचत केला होता खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विक्की कदमवार हा गेल्या अनेक वर्षापासून देह व्यापारात एजंट म्हणून सक्रिय आहे. अनेक अल्पवयीन आणि शाळकरी मुलींना देह व्यापारात विक्रीने ढकलल्याचा तपासात पुढे आले आहे.

पोलिसांचा हॉटेलवर छापा

नागपूरातील ओयो हॉटेल्स आणि इतर नामांकित हॉटेल्समध्ये रूम बुक करून ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना मुली पुरविण्याचे काम आरोपी करत होता. नागपूर पोलिसांनी एका नामांकित हॉटेलमध्ये छापा मार कारवाईत ही बाब पुढे आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com