Jalna Crime News: अपघातात मृत्यूचा बनाव; चुलत भावाने कट रचत केला होता खून

अपघातात मृत्यूचा बनाव; चुलत भावाने कट रचत केला होता खून
Jalna Crime News
Jalna Crime NewsSaam tv
Published On: 

Jalna Crime News: जालना जिल्ह्यातल्या एदलापूर येथील माजी सरपंच यांचा खून करून अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला होता. हा अपघात (Accident) नसून खून असल्याची धक्कादायक बाब पोलिस (Police) तपासात उघड झाली. (Maharashtra News)

Jalna Crime News
Bhusawal Crime News: सोने– चांदीसह ३५ हजाराचा मुद्देमाल चोरीला

गेल्या काही दिवसांपूर्वी वाटूर -जालना या महामार्गावर एदलापूरच्या माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र हा अपघात नसून त्यांचा खून करण्यात आल्याची तक्रार मयत सरपंचाच्या नातेवाईकांनी परतूर पोलिस ठाण्यात दिली होती.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्र फिरवत अखेर हा अपघात नसून खून (Crime News) झाल्याचं उघड केले आहे.

चुलत भावानेच रचला कट

मयत सरपंच यांच्या चुलत भावानेच हा कट रचून आधी अपघात घडून आणून त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या सरपंचाचा खून केल्याचे सिद्ध झाले.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बळीराम आनंदराव मरळ याला अटक केली करत त्यांच्यासह काही आणखी जण या कटात सामील असल्याने त्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. त्यातून काही आरोपी आणखी असण्याची शक्यता ही पोलिसांनी वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com