पराग ढोबळे
नागपूर : चोरट्यांकडून मंदिरातील दानपेट्या व देवाच्या अंगावरील दागिन्यांवर लक्ष केले जात आहे. रात्रीच्यावेळी मंदिरात प्रवेश करून चोरी केली जात आहे. अशाच प्रकारे नागपूरमधील महाकाली शीतला देवीच्या मंदिरातील दानपेटी चोरून नेल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत चोरीच्या घटनेतील तीन चोरट्याना अटक करण्यात आली आहे. यात दोघे अल्पवयीन आहेत.
नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खळगाव भागातील महाकाली शीतला माता मंदिरातून चोरट्यांनी चक्क दानपेटी चोरी केल्याची घटना समोर आली होती. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यामध्ये दोन चोरटे हे दानपेटी उचलून नेताना दिसून येत आहे. मंदिरातील पुजारी व भाविक सकाळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती.
८४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत
मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले होते. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास केल्यानंतर चोरट्याचा शोध लागला. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेत चोकशी केली असता आरोपीने दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी चोरट्यांकडून ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चोरीच्या घटनेत दोन अल्पवयीन
नागपुरातील मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्यात तीन जणांचा समावेश होता. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील एका मुख्य आरोपीला अटक केली. तर दोन अल्पवयीन आरोपीना सुधारगृहात पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून आणखी तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.