सागर निकवाडे
नंदुरबार : गावागावात घरपोच सेवा देण्याचे काम पोस्ट कार्यालयाकडून करण्यात येत असल्याने आजही विश्वासार्हता टीकून आहे. मात्र याच टपाल कार्यालयाकडून धक्कादायक प्रकार झाल्याचे धडगाव तालुक्यात समोर आला आहे. अर्थात पोस्टामार्फत टाकण्यात आलेले कागदपत्रांचे वाटप न करता ते फेकून देण्यात आले आहे. धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांकडून हा गैर कारभार करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या मांडवी पोस्ट ऑफिसमधील वावी, कामोद, काकडदा, घाटली, मखतारझिरा, वलवाल, मांडवी बु., मांडवी खु. तसेच जुगणी पोस्ट ऑफिसमधील निगदी, जुगणी, गोरांबा, मोडलगाव, तेलखेडी. वेलखेडी पोस्ट या गावातील सर्व लोकांचे आधार कार्ड, एटीएम कार्ड, बँकेचे चेक बुक, कोर्ट नोटीस, पॅन कार्ड व इतर महत्वाचे कागदपत्रे वडफळ्याकडे बँक ऑफ इंडिया बँकेचा मागे कचऱ्यात फेकण्यात आले असे निदर्शनास आले.
दीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले
फेकलेले कागदपत्र गावातील काही लोकांनी पाहिले असता पोस्ट ऑफिसमध्ये प्रशांत शिंदे, शुभम सोनवळ, प्राशु सोनवणे हे कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आली. परंतू पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्याकडून कुठलीच हालचाल दिसून आली नाही. धडगाव तालुक्यातील लोकांना त्यांचे कागदपत्र वाटप होत नसल्याने काही लोकांकडे ओरिजनल आधार कार्ड नाहीत. तसेच फार लोकांना माहिती नसते की आपले महत्वाचे कागद पोस्ट ऑफिस मध्ये येऊन पडले आहेत आणि त्यांचा पर्यंत हे कागद पोहचत नाहीत. यामध्ये दीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले आहेत.
वाटप केल्याबाबत नकली सह्या
पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्रे वाटप न करता फेकल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कागदपत्रे वाटप केल्याचे भासवत नागरिकांच्या नकली सह्या कर्मचाऱ्यांनी केल्याचा प्रताप समोर आला आहे. नंतर पोस्ट कर्मचारी यांचे कागद असे कचऱ्यात फेकून देतात. म्हणून पोस्ट ऑफिसमधील सर्व कर्मचारी यांचावर तात्काळ कडक कार्यवाही करण्यात यावी; अशी मागणी लोकांनी व्यक्त केली आहे.
अधिकाऱ्यांची मात्र चुप्पी
एकीकडे आदिवासी बांधवांना एक आधार कार्ड काढण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करत तालुका स्तरावर यावं लागते. मात्र पोस्टमार्फत आलेले आधार कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकल्याने नागरिकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोस्टाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या विषयावर चुप्पी साधत कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.