Crime News : विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार, शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नागपूरमधील घटना

Nagpur Crime News : नागपूर पोलिसांनी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार करण्यात आलाय.
Chopda Crime News
Chopda Crime NewsSaam tv
Published On

Nagpur Crime News : बदलापूर येथे शाळकरी मुलीसोबत झालेल्या अत्याचारामुळे राज्यात खळबळ माजली आहे. राज्यातील अनेक घटना समोर येत आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये आता धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या शिक्षकाचा पराक्रम समोर आलाय. त्याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांची कारवाई केली. संकल्प मेढा, वय 47 असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो नामांकित शाळेत इतिहास आणि इंग्रजीचा शिक्षक आहे.

Chopda Crime News
Crime News : ऐकावे ते नवलच! वर्धा जिल्ह्यात दारूबंदी, त्यानं लढवली अजब शक्कल, पण पोलिसाच्या सापळ्यात कसा अडकला?

४७ वर्षीय संकल्प मेढा याच्याविरोधात नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार दिली होती. विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल फेकून मारणे, डस्टर मारणे, पालकांबाबत आपत्तीजनक बोलणे, अभद्र व्यवहार करीत असल्याची तक्रार मुख्याध्यापकांकडे दिली होती.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून शाळेने तीन शिक्षकांची समिती नेमली, समितीच्या अहवालानंतर मुख्याध्यापकांनी पोलिसांत तक्रार दिली. आरोपी शिक्षकविरुद्ध पोक्सो सह इतर गुन्ह्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिासांनी शिक्षकाला अटक केली. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Chopda Crime News
Crime News : भयंकर! कर्जतमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, फोटो-व्हिडीओ व्हायरल; ७ जणांना ठोकल्या बेड्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com