Nagpur : नागपूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध व्यवसायिकाचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

Nagpur News : नागपूरच्या कामठी शहरातील कापड व्यावसायिक शैलेंद्र रोडगे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत
NAGPUR CLOTH MERCHANT SHAILENDRA RODGE FOUND DEAD UNDER SUSPICIOUS CIRCUMSTANCES IN KAMTHI
NAGPUR CLOTH MERCHANT SHAILENDRA RODGE FOUND DEAD UNDER SUSPICIOUS CIRCUMSTANCES IN KAMTHISaam Tv
Published On
Summary
  • कामठीतील कापड व्यावसायिक शैलेंद्र रोडगे यांचा संशयास्पद मृत्यू

  • पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला

  • पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा

  • पोलिसांनी तपास सुरु केला आहे

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमधून हादरवणारी बातमी समोर आली आहे. कामठी शहरातील कापड व्यावसायिक शैलेंद्र देवीदास रोडगे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कामठी (जुनी) पोलीस करत असून मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शैलेंद्र रोडगे हे त्यांच्या घरी एकटे होते. दरम्यान, त्यांच्या मुलाने वारंवार मोबाईलवर कॉन्टॅक्ट केला.. मात्र, अनेक वेळा फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या मुलाने शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. शेजाऱ्यांनीही घराबाहेरून हाका मारल्या, मात्र आतून कोणतीही हालचाल जाणवली नाही.

NAGPUR CLOTH MERCHANT SHAILENDRA RODGE FOUND DEAD UNDER SUSPICIOUS CIRCUMSTANCES IN KAMTHI
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

घटनेची माहिती मिळताच कामठी (जुनी) पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता शैलेंद्र रोडगे हे बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेले आढळले. तातडीने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

NAGPUR CLOTH MERCHANT SHAILENDRA RODGE FOUND DEAD UNDER SUSPICIOUS CIRCUMSTANCES IN KAMTHI
Kitchen Hacks : चाकू वापरताना 'या' ७ गोष्टी लक्षात ठेवा; अपघातही टळतील, कामही होईल झटपट

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घरामध्ये औषधांच्या गोळ्या तसेच काही इंजेक्शन अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. त्यामुळे या मृत्यूबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात असून, मृत्यूचे नेमके कारण काय याबाबत संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील साहित्य जप्त करून तपासासाठी पाठविले आहे. या प्रकरणी कामठी (जुनी) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सर्व संबंधित बाबींचा बारकाईने तपास सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com